कलाकार मंडळींच्या रिअललाईफ जोड्या या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.काही कलाकार आपल्या खासगी आयुष्याबाबत फारसं बोलताना दिसत नाहीत. पण काही कलाकार मात्र खासगी आयुष्याबाबत व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात.असंच सोशल मीडियावर ते त्यांचं प्रेम देखील व्यक्त करतात. पण सध्या एका कलाकाराच्या पत्नीने तिचा मिश्किल अंदाज दाखवला आहे.(mandar jadhav)

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. या मालिकेमधील जयदीप या पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अभिनेता मंदार जाधव जयदीप हे पात्र साकारतो. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. नुकतंच मंदारने उन्हाळ्यानिमित्त एक फोटो शेअर केलाय.ऊन जरा जास्त आहे,दरवर्षी वाटत.असं म्हणत विद आऊट टी-शर्ट असलेला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला.त्याचा असा हॉट फोटो पाहून अनेक तरुणी घायाळ झाल्यात. यात त्याच्या पत्नीचा देखील समावेश असून i am comimg back अशी कमेंट मितिका म्हणजे त्याच्या पत्नीने केली आहे.तर तिची ही कमेंट सध्या लक्षवेधी ठरतेय. तसेच हा फोटो देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.(mandar jadhav)

दरम्यान तुम्हाला माहित आहे का? मंदारची बायको ही सुद्धा अभिनेत्री आहे.मितिका शर्मा असं तिचं नाव असून तिने हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे.मंदार आणि मितिकाने 22 एप्रिल 2016 रोजी एकमेकांशी लग्न केलं.तसेच त्यांना दोन मुलं असून हिदान आणि रेहान हे त्यांचं नाव आहे.मितिका ही सध्या सिनेसृष्टीपासून लांब असली तरीही तिने देवोंके देव महादेव..’, ‘ख्वाहिश’,’संतान’ अशा प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये तिने काम केलं. मितिका खूपच ग्लॅमरस देखील आहे.तिने अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.काही महिन्यांपूर्वी तिने स्टार प्रवाह पुरस्कार या कार्यक्रमात ती मंदारसोबत देखील दिसून आली.त्यावेळी देखील तिचा गळ्याम्र्स अंदाज पाहायला मिळाला.
हे देखील वाचा : अभिनेता हृषीकेश शेलारच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न, हृषीकेश ने शेअर केलेले सुंदर फोटोज पाहा
