शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझा घटस्फोट का काढतोस?”, राकेश-विशालमध्ये हाणामारी; बिग बॉस संतापून म्हणाले…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 2, 2026 | 12:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6

राकेश-विशालमध्ये हाणामारी

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस’चा मराठीचा सहावा सीझन आता अनीतिम टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या शोच्या ग्रान फिनालेला अगदी कमी दिवस उरले आहेत. यादरम्यान फिनालेला पोहोचण्यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ सुरु असलेली पाहायला मिळते. बिग बॉसच्या घरात ८० दिवस घालवल्यानंतर नॉमिनेट न होण्याचा सदस्य प्रयत्न करत आहेत. या दरम्यान नुकताच घरात एक नॉमिनेशन टास्क परत पडला. ज्याने बिग बॉसच्या घरात एक वेगळाच ट्विस्ट आलेला पाहायला मिळाला. या टास्कमध्ये जो सदस्य नॉमिनेट होईल त्याच फिनालेमध्ये जाण्याचं स्वप्न तुटणार हे सदस्यांच्या निर्णयावर ठरणार.

आणखी वाचा : दुसऱ्यांदा आई झाली सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, लेकाला दिला जन्म, परिणीती चोप्रा ते करीना कपूरने केलं अभिनंदन

नुकतंच बिग बॉसचा नवीन प्रोमो सामोरे आला. ज्यात बिग बॉस सदस्यांना टास्क देतात. ज्यांच्या नावाचं टीव्ही फुटणार त्यांचं फिनालेमध्ये पोहोचण्याचं स्वप्न तुटणार असं बिग बॉस जाहीर करतात. यादरम्यान राकेश आणि विशाल या दोघानामध्ये ही मोठा राडा झालेला पाहायला मिळतो. विशाल नॉमिनेट करत राकेश म्हणाला, “मी विशालचं नाव घेत आहे. तो लोकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलतो, या गोष्टी मला चुकीच्या वाटल्या.” हे ऐकताच विशाल चिडतो आणि म्हणतो, “तू जेव्हा माझ्या वयाबद्दल बोलतो तेव्हा पर्सनल नाही का? तुझा घटस्फोट काय झालाय…” तर विशालचं हे वाक्य पूर्ण व्हायच्या आतच राकेश संतापतो आणि “तू माझा घटस्फोट कशाला काढतोय,” असं विचारतो. आणि यामुळे दोघांमधील भांडण इतकं वाढतं की त्यांच्यात हाणामारी होते. (Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राकेश व विशाल एकमेकांना भिडताना बघून इतर सर्व सदस्य त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण दोघांमधील भांडण इतकं वाढतं की बिग बॉसला मध्ये पडावं लागतं. “राकेश -विशाल लांब व्हा,” असं बिग बॉस त्यांना ओरडून सांगतात आणि घरात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतं. आता या दोघांच्या भांडणामुळे घरात काय बदल येणार? आणि ‘बिग बॉस’ राकेश-विशालला काय शिक्षा देणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. (Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा : आई-वडीलांचं निधन आणि शेतमजुरी; रील स्टार सुरज चव्हाणला ‘असं’ मिळालं FAME, UNKNOWN FACTS

Tags: big bossBigg Boss Marathi 6entertainmentraqesh bapatvishal kotian
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bengali actor Rahul Banerjee death

सुप्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, शूटिंगदरम्यान घडली घटना, सहकलाकार म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.