रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, शूटिंगदरम्यान घडली घटना, सहकलाकार म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 30, 2026 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bengali actor Rahul Banerjee death

सुप्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू, शूटिंगदरम्यान घडली घटना, सहकलाकार म्हणाला…

Bengali actor Rahul Banerjee death : बंगाली चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक आणि दु:खद बातमी समोर येत आहे. चित्रपट अभिनेते राहुल अरुणोदय बॅनर्जीचे निधन झाले आहे. राहुल अवघा ४३ वर्षांचा होता. ओडिशातील समुद्रकिनाऱ्यावर शूटिंग करताना पाण्यात बुडून राहुलचा मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण बंगाली चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अभिनेता तलासरीमध्ये शूटिंग करत होता. दरम्यान, तो समुद्रकिनारी समुद्रात बुडाला. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हा अपघात आऊटिंगदरम्यान नसून शूटिंगनंतर झाला, जेव्हा अभिनेता शूट संपवून पाण्यात उतरला. त्यानंतरही राहुल बाहेर आला नाही, त्यानंतर शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह बाहेर काढून तातडीने दिघा रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

राहुलचा को-स्टार भास्कर बॅनर्जी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की जेव्हा संपूर्ण टीम शूटिंग संपवून जेवणासाठी गेली तेव्हा राहुल त्यांच्यासोबत गेला नाही. याच दरम्यान हा अपघात झाला. या दु:खद बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. पूर्व मिदनापूर जिल्हा पोलिसांनीही राहुलच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तेथील एएसपी आतिश बिस्वास यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी तपास हा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा आहे, सविस्तर तपास अद्याप सुरु आहे, त्यानंतरच काही सांगता येईल.

आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई झाली सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, लेकाला दिला जन्म, परिणीती चोप्रा ते करीना कपूरने केलं अभिनंदन

कोण आहे राहुल अरुणोदय बॅनर्जी?
राहुल अरुणोदय बॅनर्जी बंगाली इंडस्ट्रीतील खूप प्रसिद्ध अभिनेते होते. २००८ मध्ये आलेल्या ‘चिरोदिनी तुमी जे अमर’ या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची आजही प्रशंसा केली जाते. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्येही सातत्याने काम केले आहे. ‘लव्ह सर्कस’, ‘शोनो मोन बोली तोमे’, ‘ना हन्नाते आणि कागोजर बू’ याशिवाय तो इतर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दिसला आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेता झाला बाबा, काही दिवसांपूर्वीच अपघातातून वाचला, फोटोद्वारे दाखविली पहिली झलक

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, राहुल अरुणोदय बॅनर्जीने बंगाली अभिनेत्री प्रियांका सरकारसोबत लग्न केले. दोघेही ‘चिरोदिनी तुमी जे आम’मध्ये एकत्र दिसले होते. दोघांनाही एक मुलगा आहे. २०१७ मध्ये दोघेही वेगळे झाले, पण आपल्या मुलाच्या संगोपनासाठी दोघेही २०२३ साली पुन्हा एकत्र आले.

Tags: bengali actor deathRahul BanerjeeRahul Banerjee death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Zayed Khan On Mother Zarine Hindu Funeral

मुस्लिम असणाऱ्या जरीन खानवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का?, सततच्या चर्चांवर लेकाने सोडलं मौन, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.