शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नाडी सुरु होती पण…”, शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या रात्री काय घडले?, मैत्रिणीकडून खुलासा, म्हणाली, “तिचा नवरा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 1, 2025 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shefali Jariwala Death

"नाडी सुरु होती पण…", शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या रात्री काय घडले?, मैत्रिणीकडून खुलासा, म्हणाली, "तिचा नवरा…"

Shefali Jariwala Death : ‘कांटा लगा’ या गाण्याने देशभर आपली छाप पाडणारी अभिनेत्री शेफाली जरीवाला आता आपल्यात नाही. २७ जूनच्या रात्री तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही कारण पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट रिझर्व ठेवले आहे. परंतु हे निश्चितपणे सांगितले जाते की तिचा बीपी कमी होता आणि यामुळे हे घडले. अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने सिनेविश्वावर शोककळा पसरली. याचबरोबर शेफालीच्या निधनाने पती पराग त्यागीही पूर्णता खचला. कलाविश्वातून अनेक कलाकार मंडळी अभिनेत्रीच्या अंतिम संस्काराला उपस्थित होते. यानंतर आता शेफालीची मैत्रीण पूजा घई हिने अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल काही खुलासा केला आहे.

पूजा घई यांनी पत्रकार विक्की लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, रात्री शेफाली जरीवालाचा मृत्यू झाला आणि पराग त्यागी यावेळी कुठे होता याबाबत तिने भाष्य केलं. तिने २७ जूनच्या रात्रीचा उल्लेख करत म्हटलं की, “त्याचे कुटुंब आणि मला जितपत समजले आहे त्यावरुन घरी सत्यनारायण पूजा केली गेली होती. जेव्हा शेफलीवर अंत्यसंस्कार करायचे होते त्यादिवशी आम्हाला घरात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली. त्यावेळी असं पाहायला मिळालं की पूजेसाठी घर सजवले गेले होते. सत्यानारायण पूजेसाठी तयारी केली गेली होती”.

आणखी वाचा – “चित्रपट नाही मुजरा बघायला जा”, चित्रपटांच्या वाढत्या दरांचा परेश रावलला त्रास, थिएटरमध्ये विश्रांती घ्यायला जाणाऱ्यांनाही टोकलं

पूजाने पुढे स्पष्ट केले की रात्री, शेफालीने नेहमीप्रमाणेच तिचे जेवण केले आणि परागला सिम्बाला फिरवण्यास सांगितले, पराग खाली येताच शेफालीने त्याला बोलावून घेतले. घराच्या सहाय्यकांनी तिच्या नवऱ्याला सांगितले की, दीदीची तब्येत ठीक नाही. तेव्हा पराग मदतनीसला म्हणाला, ठीक आहे तुम्ही सिम्बाला फिरवायला खाली या, मी शेफालीकडे जातो.

आणखी वाचा – “मटण खाणं माझी आवड…”, वारीतील सहभागानंतर डीपी ट्रोल होताच नेटकऱ्यांना दिलं उत्तर, म्हणाला, “देव कर्म बघत नाही…”

पूजा घई पुढे म्हणाली की, त्यानंतर जे काही घडले त्याबद्दल प्रत्येकाला आश्चर्य वाटले. पराग लिफ्ट खाली येण्याची प्रतीक्षा करु लागला आणि मदतनीस खाली आली आणि त्याने सिम्बाला तिच्याकडे दिलं आणि तो वर गेला. परागने शेफालीला पाहिले आणि तिची नाडी तपासली तर नाडी सुरु होती. मात्र ती तिचे डोळे उघडत नव्हती आणि तिचे शरीर सुन्न झाले. परागच्या त्वरित लक्षात आले की काहीतरी चुकीचं आहे. त्याने ताबडतोब तिला रुग्णालयात नेले. पण तिला बेल्लेव्यू येथे आणण्यापूर्वी ती आधीच मरण पावली होती”.

Tags: bollywood newsShefali JariwalaShefali Jariwala Death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Shefali Jariwala death reason

मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्वचेसाठी ट्रिटमेंट घेतली अन्...; शेफाली जरीवालाच्या निधनाबाबत जवळच्या मैत्रिणीचे धक्कादायक खुलासे

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.