शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; रश्मिका मंदान्ना – विजय देवरकोंडाची लगीनघाई, लग्नाची तारीखही आली समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 19, 2026 | 11:03 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
vijay devarkonda rashmika mandanna marriage

आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; रश्मिका मंदान्ना - विजय देवरकोंडाची लगीनघाई, लग्नाची तारीखही आली समोर

vijay devarkonda rashmika mandanna marriage : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले नसले तरी आता मात्र त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आणि या चर्चेला सुरुवात झाली ती म्हणजे विजय देवरकोंडाच्या घराची सजावट पाहून. विजयचे हैदराबादमधील ज्युबली हिल्सचे घर सध्या दिव्यांनी उजळून निघाले आहे. त्याच्या घराची काही झलक सोशल मीडियावर समोर आली आहे. २६ फेब्रुवारीला दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. काही काळापासून त्यांच्या लग्नाबाबत बातम्या येत होत्या की दोघेही उदयपूरमध्ये लग्न करणार आहेत.

उदयपूरमधील एका भव्य राजवाड्यात एका खासगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची बातमी होती. तथापि, विजय देवरकोंडा किंवा रश्मिका किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी या संदर्भात कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. त्यांच्या लग्नाच्या अफवांना आणखी खतपाणी घालत, कथित जोडप्याच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिसली आहे. या निमंत्रण कार्ड बॉक्समध्ये काही भेटवस्तू देखील दिसत आहेत. या निमंत्रण पत्रात असे सांगण्यात आले आहे की, दोघांचे लग्न २६ फेब्रुवारीला होणार असून त्यानंतर ४ मार्चला हैदराबादमध्ये भव्य रिसेप्शनचे आयोजन करण्यात येणार आहे.

आणखी वाचा – आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची तब्येत बिघडली, घरीच सुरु आहेत उपचार, पोस्ट करत म्हणाली, “खूप सांधेदुखी…”

ही निमंत्रण पत्रिका विजय देवरकोंडाची आहे ज्यात लिहिले आहे की, “मी तुम्हाला एक विशेष आनंदाची बातमी देण्यासाठी आणि या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करत आहे. आमच्या कुटुंबीयांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने, रश्मिका आणि मी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी एका छोट्या आणि खासगी समारंभात लग्न करणार आहोत”.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

निमंत्रण पत्रिकेत पुढे म्हटलं आहे की, “आम्ही या नवीन अध्यायाची सुरुवात करत असताना, आमची एकता साजरी करत आणि आठवणी निर्माण करत असताना, आमच्या प्रवासाचा एक भाग असलेल्या लोकांसोबत साजरे करणे आमच्यासाठी खूप अर्थपूर्ण आहे. तुमची उपस्थिती आणि आशीर्वाद हा सोहळा आमच्यासाठी आणखी खास बनवेल. आमच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून आशीर्वाद देण्यासाठी आम्ही तुम्हाला मनापासून आमंत्रित करतो”.

आणखी वाचा – नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व दाखवणारा ‘माया’चा ट्रेलर समोर, सिद्धार्थ चांदेकर-मुक्ता बर्वेच्या भूमिकांनी वेधलं लक्ष

या मॅसेजच्या शेवटी लिहिले आहे, “आम्ही हा क्षण एकत्र साजरा करण्यास उत्सुक आहोत. शुभेच्छा, विजय (रश्मिका आणि माझ्याकडून). आता हे कार्ड खरोखर विजय-रश्मीकाच्या लग्नाचे आहे की त्यांच्या लग्नाच्या नावाने आणखी काही कार्ड व्हायरल होत आहे याची पुष्टी झालेली नाही.

Tags: south actorvijay devarkondavijay devarkonda rashmika mandanna marriage
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
 Divyanka Tripathi Discharged From Hospital
Entertainment

सासूने नजर काढली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दाखविली जुळ्या मुलांची पहिली झलक, १० वर्षांनी झाली आई

मे 30, 2026 | 10:03 am
ankita lokhande vicky jain abu dhabi vacation
Entertainment

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

मे 29, 2026 | 10:20 am
Next Post
Neena Gupta personal life

अफेअरमधून मुलीचा जन्म, सिंगल मदर म्हणून सांभाळलं; नीना गुप्ता यांनी ५० व्या वर्षी का केलं लग्न?, म्हणाल्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.