शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व दाखवणारा ‘माया’चा ट्रेलर समोर, सिद्धार्थ चांदेकर-मुक्ता बर्वेच्या भूमिकांनी वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 18, 2026 | 5:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Maya Movie Trailer

नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व दाखवणारा 'माया'चा ट्रेलर समोर, सिद्धार्थ चांदेकर-मुक्ता बर्वेच्या भूमिकांनी वेधलं लक्ष

Maya Movie Trailer : नातेसंबंधांवर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आपलेसे वाटतात. कारण ते केवळ कथा सांगत नाहीत, तर आयुष्यात व्यक्त न केल्या गेलेल्या भावनांना शब्द देतात. अशाच भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या ‘माया’ या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘माया’चा ट्रेलर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतो, माणूस खरोखरच एकटेपणाला घाबरतो की पोरकेपणाच्या भावनेला? नात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या गैरसमजुती, मनात साचत जाणाऱ्या अढी आणि त्या अढीमुळे दुरावत जाणारी माणसं यांचा भावनिक प्रवास ट्रेलरमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आयुष्य पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेली भावनिक मुक्तता आणि समजूतदार संवाद यांची जाणीव करुन देणारा हा ट्रेलर विचार करायला भाग पाडतो.

चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरने साकारलेली हाऊस फादरची भूमिका ट्रेलरमध्ये मध्यवर्ती ठरते. मुलीमध्ये रमलेला पण स्वतःच्या भावनांपासून काहीशी दूर गेलेली ही व्यक्तिरेखा मनाच्या खोल कप्प्यात डोकावते. मुक्ता बर्वेची व्यक्तिरेखा आयुष्याच्या वळणावर उभी राहून स्वतःचे प्रश्न शोधताना दिसते, तर विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांचे अनुभवसंपन्न अस्तित्व कथेला स्थैर्य आणि वास्तवाची किनार देते. ट्रेलरमध्ये प्रत्येक पात्राच्या नजरेतून वेगवेगळ्या वेदना आणि आशा डोकावताना दिसतात.

आणखी वाचा – सिद्दार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांच्या निधनाने अभिनेता भावुक, म्हणाला, “आम्हाला झोपेत सोडून गेलात…”

विशेष म्हणजे, ट्रेलरमध्ये संवादांपेक्षा नजरेतून व्यक्त होणं, शांतता आणि प्रसंगांची मांडणी अधिक बोलकी ठरत आहेत. काही क्षण तर असे आहेत की, शब्दांशिवायही मनात खोलवर ठसतात. गिरीश ओक यांची भूमिका या भावविश्वाला वेगळा परिमाण देते. त्यांच्या व्यक्तिरेखेतील अंतर्गत संघर्ष, न सांगितलेले आघात आणि स्वतःभोवती उभारलेली भिंत यामुळे कथानकाला एक गूढ आणि गंभीर स्वर मिळतो. ट्रेलरचा शेवट आश्वासक असला तरी तो अनेक प्रश्नही उभे करतो आणि याच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर मिळणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “‘माया’ मधून प्रत्येकाच्या मनात दडलेल्या, व्यक्त न केल्या गेलेल्या भावनांना पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात काही नाती आपण जपतो, तर काही नकळत तुटत जातात. पण प्रत्येक नातं आपल्याला काहीतरी संचित देऊन जातं. या कथेतून आम्हाला हे मांडायचं आहे की, भूतकाळाच्या सावल्या कितीही गडद असल्या तरी एकमेकांमधील संवाद आणि कुणाचातरी मायेने झालेला स्पर्श यांच्या जोरावर आयुष्याच्या नवीन प्रवासाची सुरुवात करता येणं शक्य असते. प्रेक्षकांना या प्रवासात स्वतःचं प्रतिबिंब दिसेल,अशी आम्हाला खात्री आहे”.

आणखी वाचा – आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची तब्येत बिघडली, घरीच सुरु आहेत उपचार, पोस्ट करत म्हणाली, “खूप सांधेदुखी…”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Tags: marathi moviemaya movieMaya Movie Trailer
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
 Divyanka Tripathi Discharged From Hospital
Entertainment

सासूने नजर काढली आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दाखविली जुळ्या मुलांची पहिली झलक, १० वर्षांनी झाली आई

मे 30, 2026 | 10:03 am
Next Post
vijay devarkonda rashmika mandanna marriage

आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट अन्…; रश्मिका मंदान्ना - विजय देवरकोंडाची लगीनघाई, लग्नाची तारीखही आली समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.