शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् देवाने पुन्हा एकदा जीवदान दिलं, विद्याधर जोशींचं फुफ्फुसच ८३ टक्के निकामी, मरणाच्या दारात पोहोचले आणि…; सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 14, 2024 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Vidyadhar Joshi disclosed that he suffered from Interstitial lung disease which is a serious disease

...अन् देवाने पुन्हा एकदा जीवदान दिलं, विद्याधर जोशींचं फुफ्फुसच ८३ टक्के निकामी, मरणाच्या दारात पोहोचले आणि...; सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग

मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजण करणारे अभिनेते म्हणजे विद्याधर जोशी. विनोदी, गंभीर तसेच नकारात्मक भूमिकांद्वारे त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. तसेच त्यांनी अनेक रियालिटी माध्यमांद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र अभिनेते गेले अनेक दिवस एका गंभीर आजाराशी झुंज देत होते आणि हा एक असा आजार होता, ज्यावर औषधही उपलब्ध नाहीत.

स्वत: विद्याधार जोशींनी त्यांच्या या गंभीर आजारबद्दल खुलासा केला आहे. सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी यांनी आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला आहे. फुप्फुसाशी संबंधित असलेला Interstitial lung disease (ILD) आजार झाल्यानंतर ते फुप्फुस प्रत्यारोपण दरम्यानचा अनुभव या मुलाखतीत विद्याधर जोशींनी सांगितला आहे.

विद्याधर यांनी त्यांच्या या आजारपणाबद्दल सांगताना असं म्हटलं की, “मला जिने चढतानादेखील त्रास व्हायचा. तीन मजले चढलो तरीदेखील मला मोठी धाप लागायची. तसेच धावून शांत होईपर्यंतचा काळदेखील वाढत असल्याचे मला जाणवायला लागले. तसेच मला १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा कोविड झाला. कोविडमधून बरा झाल्यानंतर खूप त्रास झाला. सतत ताप येऊ लागला, मग डॉक्टरकडून उपचार सुरू केले. नेमकं काय झालं असावं हे पाहण्यासाठी मी सीटी स्कॅन केले. त्यावेळी फुप्फुसावर जखमा दिसल्या. तेव्हा हे सगळं कोविडमुळे असावे असे वाटत होते. पण, एका डॉक्टरने ही जखम दुसरीच कसली तरी असल्याचे सांगितले”.

View this post on Instagram

A post shared by Vidyadhar Joshi (@bappajoshi27)

आणखी वाचा – “४५ महिने होऊनही अद्याप…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत बहिणीचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाऱ्हाणं, म्हणाली, “या प्रकरणात…”

यापुढे ते असं म्हणाले की, “त्यानंतर आम्ही काही वैद्यकीय चाचण्या केल्या तेव्हा डॉक्टरांनी मला फुप्फुसातील फायब्रॉसिस झाला आहे असं सांगितले. त्यातही मला Interstitial lung disease (ILD) या प्रकारातील आजार झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावर त्यांनी हा आजार कठीण असल्याचेदेखील म्हटले. मात्र कॅन्सर किंवा इतर तत्सम जसे औषध असतात किंवा या आजारांवर औषध घेऊन हे आजार बरेही होतात. मात्र मला झालेल्या आजारावर काहीच औषध नसल्याचे मला डॉक्टरांनी सांगितले. तसेच हा आजार थांबवता येत नाही, कसा होतो याची कल्पनाही नाही. तसेच यावर काहीच उपाय नसल्याचे कळले तेव्हा मात्र आम्ही दोघे जण घाबरलो होतो”.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ ट्रोल होऊनही सुरुच राहणार, चॅनलच्या बिजनेस हेडचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मालिका डोक्यावर घेतात आणि…”

यापुढे त्यांनी “या गंभीर आजारामुळे माझे फुप्फुस १३ टक्के निकामी झाले. मग ६ नोव्हेंबरला माझे फुप्फुस १४ टक्के निकामी झाले. याचे प्रमाण महिनाभरात वाढले आणि मग माझं फुफ्फुस ४३ टक्के निकामी झाल्याचे समोर आले. एका महिन्यात एवढा आजार बळावेल असं वाटले नव्हते” असेही सांगितले. दरम्यान, ‘जीवाची होतेय काहिली’ या मालिकेतून त्यांनी अचानक एक्झिट घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. बाप्पा जोशी नेमके कुठे गेले?, त्यांनी मालिका का सोडली? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू होती आणि याची उत्तरे या मुलाखतीतून मिळाली आहेत.

Tags: मराठी अभिनेतेमराठी बातमीमराठी ज्येष्ठ अभिनेतेइंटरस्टिशियल फुफ्फुसाचा रोगबिग बॉस मराठी फेमविद्याधर जोशीbigg boss marathi fameCritical Disease NewsInterstitial Lung Diseasemarathi actorMarathi newsMarathi senior actorvidyadhar joshi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Kranti Redkar Post For Her Husband

विजय सत्याचाच होणार! आर्यन खान प्रकरणात दिल्ली हायकोर्टाचा निर्णय ऐकताच क्रांती रेडकरची नवऱ्यासाठी पोस्ट, म्हणाली, "त्यांच्या बाजूनं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.