शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांचे निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर, ‘या’ अभिनेत्रीने दिली साथ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 2, 2026 | 10:32 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
arjun bijlani father in law

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांचे निधन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर, 'या' अभिनेत्रीने दिली साथ

arjun bijlani father in law : अर्जुन बिजलानी यांचे सासरे राकेश चंद्र स्वामी यांचे १ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुखापतीतून सावरलेले आणि जीवनाशी लढा देत असलेले ७३ वर्षीय राकेशचंद्र स्वामी यांनी १ जानेवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. यामुळे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. अर्जुन बिजलानी हे त्याच्या सासरच्या अगदी जवळ होते. स्मशानभूमीत त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. तो आपल्या लहान मुलाला मिठी मारताना दिसला. त्याच्या डोळ्यात अश्रू असून अभिनेत्याने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला किसही केले.

अंत्यसंस्काराला टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अर्जुन बिजलानीसोबत घट्ट नाते असलेल्या निया शर्मानेही शोक व्यक्त केला. या कठीण काळात त्यांनी कुटुंबाला साथ दिली. एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री अर्जुन बिजलानीच्या कुटुंबातील सदस्याला मिठी मारताना दिसली. नियाचे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी चेतना पांडे आणि कनिका मानही उपस्थित होत्या.

आणखी वाचा – लग्नानंतर हनिमूनसाठी परदेशात पोहोचले सोहम-पूजा; ‘ते’ फोटो शेअर करत चाहत्यांना दाखवली खास झलक

View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

राकेश चंद्र स्वामी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा निशंक स्वामी आणि मुलगी नेहा आहे, जिचे लग्न अर्जुन बिजलानीशी झाले आहे. एका जवळच्या कुटुंबातील सदस्याने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले की, २९ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची प्रकृती ठीक होती. रात्रीच्या जेवणापूर्वी त्यांना अचानक पक्षाघाताचा झटका आला, त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, जिथे त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले.

आणखी वाचा – “आपण खचलो तर…”, आई कुठे… फेम अभिनेत्रीने अर्चना पाटकर यांच्यासाठी शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “ती नकळत आपल्यावर…”

View this post on Instagram

A post shared by ETimes (@etimes)

अर्जुन आणि नेहा नवीन वर्ष साजरे करण्यासाठी दुबईला गेले होते, पण नशिबाला काहीतरी वेगळंच होतं. वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांना तातडीने परतावे लागले. कामाबद्दल बोलायचे झाले तर अर्जुन बिजलानी नुकताच ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये दिसला होता. त्याने केवळ शोमध्ये भाग घेतला नाही तर आरुष भोला आणि अरबाज पटेल यांना पराभूत करुन जिंकला. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला २८ लाखांचे बक्षीस मिळाले.

Tags: Arjun bijlaniemotional storyentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Govinda do household chores

"आई मला मुलाऐवजी सूनेसारखी वागवायची", गोविंदाचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, "भांडी घासायला आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.