आपल्या दमदार अभिनयाने चर्चेत राहणारा बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा त्याच्या चित्रपटामुळे व विविध भूमिकांमुळे कायमच चर्चेत राहत असतो. अभिनयासह त्याच्या लूकनेही तो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. अशातच विकी त्याच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे आणि त्याचे या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
‘छावा’मधील त्याचे काही खास फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. विकी कौशलचा ‘छावा’मधील हा खास लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये विकीने योद्ध्याची वेशभूषा केली आहे. या फोटोमध्ये विकीने धोती कुर्ता परिधान केला आहे. तर कमरेला लाल गमछा बांधलेला पाहायला मिळत आहे. तर गळ्यात आणि हातात त्याने रुद्राक्ष व जपमाळ घातलेली दिसत आहे. यासह दाढी व कपाळाला तीन बोटांनी लावलेला गंधदेखील पाहायला मिळत आहे.
#VickyKaushal Is True Chameleon 🙌
— Ashwani kumar (@BorntobeAshwani) April 23, 2024
These images from #Chaava set, where @vickykaushal09 captured as #ChhatrapatiSambhajiMaharaj is the proof of dedication and conviction 💯
The long beard, moustache and grown hair shows his commitment. 👏 pic.twitter.com/EtE9imxY4i
विकीचा हा खास लूक चाहत्यांच्या खूपच पसंतीस पडला असून अनेकांनी त्याच्या या लूकचे कमेंट्सद्वारे कौतुक केले आहे. “कोणत्याही पात्रासारखं हुबेहूब दिसणं हे खरंच खूप कठीण काम आहे. विकी कौशल हा त्याच्या पिढीतील सर्वात बुद्धिमान कलाकार आहे. या लूकमध्ये विकी खरचं एक योद्धा दिसत आहे. या भूमिकेला केवळ विकी कौशलचं न्याय देऊ शकतो” अशा अनेक कमेंट्सद्वारे विकीच्या चाहत्यांनी विकीच्या या लूकचे कौतुक केले असून या चित्रपटातील त्याची भूमिका मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुकतादेखील दर्शवली आहे.
आणखी वाचा – “तिसरं लग्न कधी करणार?”, आमिर खानला दुसऱ्या घटस्फोटानंतर विचारण्यात आला थेट प्रश्न, म्हणाला, “माझी मुलं…”
दरम्यान, विकीच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहे. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल संतोष जुवेकरनेदेखील एक खास पोस्ट केली होती. या पोस्टद्वारे त्याने आम्ही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता हिंदीसह मराठी प्रेक्षकांनादेखील या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.