गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिसरं लग्न कधी करणार?”, आमिर खानला दुसऱ्या घटस्फोटानंतर विचारण्यात आला थेट प्रश्न, म्हणाला, “माझी मुलं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 24, 2024 | 5:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aamir Khan talks about his children and his personal life in The Great Indian Kapil Show

"तिसरं लग्न कधी करणार?", आमिर खानला दुसऱ्या घटस्फोटानंतर विचारण्यात आला थेट प्रश्न, म्हणाला, "माझी मुलं..."

छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय कॉमेडी शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. या शोने आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या शोमध्ये राजकीय, मनोरंजन, खेळ यासह प्रत्येक क्षेत्रातील खास व्यक्तींनी हजेरी लावली आहे. मात्र या शोमध्ये यायला बॉलिवूडमधील एका कलाकाराला तब्बल दहा वर्षी लागली आहेत आणि हा अभिनेता म्हणजे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान. आमिर खान ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पाहुणा म्हणून दिसणार आहे. आमिर पहिल्यांदाच कपिल शर्माच्या शोमध्ये आला आहे.

आमिर खान ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या आगामी भागामध्ये सहभागी होणार असून या आगामी भागाचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे, ज्याची झलक पाहिल्यानंतर हा भाग मजेशीर असणार असल्याचे दिसत आहे. या भागात आमिर खान त्याच्या शेवटच्या दोन फ्लॉप चित्रपटाबद्दल तसेच अवॉर्ड शोबद्दलच्या त्याच्या नापसंतीबद्दलदेखील बोलणार आहे. याशिवाय तो त्याच्या मुलांबद्दल बोलणार आहे, जे त्याचे अजिबात ऐकत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

आणखी वाचा – “जुनाट पद्धत मोडून…”, लेकीसाठी पाळण्याचा वापर न करण्यावरुन सई लोकूरची पोस्ट, म्हणाली, “पाळण्याची जुनी पद्धत…”

आमिरचे रीना दत्ता व किरण राव यांच्याशी लग्न झाले होते. परंतु आता तो त्याच्या दोन्ही पत्नींपासून घटस्फोटित आहे. घटस्फोटानंतरही तो त्याच्या दोन्ही पत्नींचा चांगला मित्र आहे. अमीरला त्यांच्या पहिल्या पत्नीपासून जुनैद नावाचा मुलगा आहे आणि किरण रावपासून आयरा व आझाद अशी दोन मुलं आहेत. मात्र त्याची मुलं त्याचं अजिबात ऐकत नसल्याचे त्याने या प्रोमोमध्ये म्हटलं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून कपिल व अर्चनासह सगळे प्रेक्षक हसायला लागतात.

आणखी वाचा – Video : जुही चावलाही गौरव मोरेवर फिदा, हिंदी शोमध्ये अभिनेत्याने केलेली नक्कल पाहून भारावली, चाहते म्हणाले, “अभिमान वाटतो कारण…”

दरम्यान, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा हा नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये तो ‘माझी मुलं माझं अजिबात ऐकत नाहीत” असं म्हणतो. तसेच या प्रोमोच्या शेवटी कपिलने आमिरला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही एक मोठा प्रश्नही विचारला आहे. यावेळी कपिलने आमिरला विचारले की, “तो आयुष्यात सेटल होण्याचा विचार करत आहे का?” मात्र, यावर अभिनेत्याने नेमके काय उत्तर दिले हे या आगामी भागामध्येच कळेल.

Tags: aamir khanBollywood entertainment newsthe great indian kapil show
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Vicky Kaushal upcoming film Chhava movie’s photo viral on social media

'छावा' चित्रपटामधील विकी कौशलचा लूक व्हायरल, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.