‘वादळवाट’ या लोकप्रिय मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अदिती सारंगधर. मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ते तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसेच ती तिच्या खाजगी जीवनाबद्दलची माहितीही देत असते.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आई झाली. या गरोदरपणाच्या काळात तिला अजब डोहाळे लागले होते. याबद्दल तिने नुकत्याच एका मुलाखतीत भाष्य केले आहे. अभिनेत्रीला तिच्या गरोदरपणात बिअर प्यायचे डोहाळे लागले असल्याचे म्हटले आहे. ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयी सांगितले आहे. या मुलाखतीत तिने तिच्या गरोदरपणा व त्यानंतरच्या काळाबद्दल भाष्य केलं आहे.
यावेळी अदितीने असं म्हटलं की, “गरोदरपणाच्या सुरुवातीला मी खूपच उत्सुक होते. मला तेव्हा बिअर प्यायचे डोहाळे लागले होते. मी भारतीय पदार्थ काही खाल्लेच नाहीत. मी तेव्हा फक्त सलाड खायचे आणि बिअरच प्यायचे. मी बिअर प्यायले नाहीतर मला कसंतरी व्हायचं, मला राग यायचा. तर मी डॉक्टरांना विचारले काय करु?, तर ते म्हणाले ठीक आहे. दोन-दोन सिप घ्या. मग मी नऊ महिने बियरच प्यायले”.
यापुढे ती असं म्हणाली की, “भात आणि फोडणी वगैरे आली ना तर त्या फोडणीतली एक एक मोहरी काढून बाजूला करायचे. तर घरभर अशा १००-२०० मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे मी तेव्हा भारतीय पदार्थ पूर्णच बंद केलं होतं. त्यामुळे फक्त सलाड व बिअरच प्यायले”.
दरम्यान, अदिती झी मराठी वहिनीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. या मालिकेबरोबरच तिने ‘हम बने तुम बने’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘लक्ष्य’ मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या मालिकांव्यतिरिक्त तिने ‘उलाढाल’, ‘नवरा माझा भवरा’, ‘नाथा पुरे आता’ अशा अनेक चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.