नव्वदीच्या दशकात आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मोहनी घालणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. मराठी सिनेसृष्टीचा एक काळ वर्षा यांच्या नावावर होता. सिनेविश्वात काम करताना त्यांनी मालिकेकडे पाठ फिरवली होती. त्यानंतर आता तब्बल दहा वर्षांनी त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतून मालिकाविश्वात कमबॅक केलं आहे. आजही त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती तेव्हा चाहत्यांसोबतचा एक विचित्र किस्सा त्यांनी सांगितला आहे.(Varsha Usgaonkar Incidence)
चाहत्याचा एक किस्सा शेअर करताना वर्षा यांनी सांगितलं, त्यांचं कोल्हापुर येथे शूटिंग सुरू होतं. त्यावेळी त्या कोल्हापुरात एक हॉटेलवर थांबल्या होत्या. त्यावेळी घडलेला किस्सा सांगत वर्षा म्हणाल्या, हॉटेलमध्ये असताना सकाळी साडेसहा वाजता हॉटेलमधील माझ्या रुमची बेल वाजली. इतक्या सकाळी हॉटेलचे साफसफाई करणारे कर्मचारी असतील असा माझा समज झाला.
पाहा का ओरडली वर्षा तिच्या चाहत्याला (Varsha Usgaonkar Incidence)
सकाळी साडेसहाला झोपेतून उठून तशाच अवतारात मी हॉटेलच्या रुमचं दार उघडलं. आणि तेव्हा समोर कोणताही सफाई कर्मचारी नव्हता. दार उघडून पाहिलं तर माझा एक चाहता होता. त्याला माझी सही हवी होती. केवळ सहीसाठी त्याने माझ्या रुमची बेल वाजवली होती. त्यानंतर मी त्याला भरपूर ओरडले असं वर्षा यांनी सांगितलं.(Varsha Usgaonkar Incidence)
हे देखील वाचा – माधुरी दीक्षित आणि करिष्मा कपूर थिरकल्या एकाच गाण्यावर
चाहते हे कलाकारांवर भरभरून प्रेम करत असतात याच हे आणखी एक उदाहरण आहे. यावेळी त्यांनी आणखी एक गमतीशीर आठवण देखील शेअर केली. त्या एकदा ट्रेनमधून प्रवास करताना झोपल्या होत्या तेव्हाच एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे. याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, मी प्रवासादरम्यान झोपली होते तेव्हा एका चाहत्याने मला झोपेतून उठवून माझी सही मागितली होती. चाहत्याने त्याचं स्टेशन येत असून उतरायचं असल्याचं कारण देत सही मागितली.
