‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून घराघरांत लोकप्रिय असलेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात ही घराघरांत पोहोचली. हास्यजत्रा हा कार्यक्रम ओळखला जातो ते म्हणजे कलाकारांच्या विनोदी स्किट्समुळे. ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रे’त असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आजवर प्रेक्षकांना पोट धरून हसवायला भाग पाडलं. त्यातीलच एक अवलिया अभिनेत्री म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात. वनिताने आजवर स्वमेहनतीवर स्वतःची ओळख स्वतः निर्माण केली. अभिनयाच्या जोरावर वनिताने आजवर हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. (Vanita Kharat Regret)
वनिताने बॉलिवूडमधील ‘कबीर सिंग’ या चित्रपटात भूमिका साकारली. या चित्रपटामुळे मोठ्या पडद्यावर स्क्रीन टाइम कमी असला तरी कमी वेळेतच ती भरपूर भाव खाऊन गेली. या चित्रपटात वनिताने मोलकरणीची भूमिका साकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनिताने बॉलिवूडमधील तिच्या कामाबाबत भाष्य केलं आहे.
पाहा बॉलिवूडमधील कामाबद्दल वनिता नेमकं काय म्हणाली (Vanita Kharat Regret)

वनिताने बॉलिवूडमधील कामाबाबत भाष्य करताना म्हटलं की, “कबीर सिंग” चित्रपटात मी मेडचं काम केलं होतं. त्यामुळे हिंदीतले बरेचसे कास्टिंग एजन्सी मला ओळखतात. त्यांच्याकडे माझं प्रोफाइल आहे. पण ते लोक मला फक्त मेडच्याच भूमिकेसाठी बोलवतात. त्यामुळे मला सारखं वाटत राहतं की, मी एकदा मेडची भूमिका केलीच आहे पण जर मला सारखी तिचं भूमिका ऑफर होत राहिली तर मी किती आणि कोणकोणत्या प्रकारची मेड साकारु. मला वेगवेगळ पात्र साकारायला खूप आवडतील. कॉमेडी तर मी करतेच पण मला स्वत:ला चाचपडून पाहायचे आहे की, मी हे अशा प्रकारचे पात्र साकारु शकते का.”
हे देखील वाचा – नेपोटीजम बाबत स्पष्टच बोलली श्रिया पिळगावकर म्हणाली ,””मी घराणेशाहीचं कार्ड…”
यापुढे बोलताना वनिता म्हणाली आहे की, “मला नेहमीच वाटतं की मी एखाद्या कलाकाराला एकाच साच्यामध्ये न ठेवता आपण त्याला वेगवेगळ्या भूमिका दिल्या तर ते लोक वेगवेगळी काम करु शकतात. कास्टिंग एजन्सीबद्लही मला तेच वाटतं, ते लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रयत्नच करत नाही. त्यांना एखादा डाटा मिळाला आणि त्या व्यक्तीला मेडच्या किंवा इतर अन्य भूमिकेत त्यांनी पाहिले की, पुढच्या चित्रपटातही त्यांना तशाच प्रकारच्या भूमिका साकारायला बोलावले जाते. त्यासाठी हवतरं तुम्ही ऑडिशन घ्या पण ते तसं करत नाही. याच गोष्टीचा मला खूप राग येतो. ‘कबीर सिंग’नंतर मला कित्येकदा त्याच पात्रासाठी बोलावलयं. त्यामुळे मी आता त्यांना नाही म्हणणं सुरु केलयं.