बुधवार, मे 14, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उर्फी जावेदला माहित नाही झाकीर हुसेन कोण?, प्रश्न विचारताच उत्तर देणं टाळलं, नेटकऱ्यांकडून ट्रोल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 17, 2024 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Urfi Javed  Troll

उर्फी जावेदला माहित नाही झाकीर हुसेन कोण?, प्रश्न विचारताच उत्तर देणं टाळलं, नेटकऱ्यांकडून ट्रोल

Urfi Javed  Troll : उस्ताद झाकीर हुसेन आता आपल्यात नाहीत. सोमवारी सकाळी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात त्यांचे निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी उस्ताद यांच्या निधनामुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला असतानाच, बॉलिवूडपासून राजकीय घराण्यापर्यंत सर्वांनाच दुःख झाले आहे. पण या सगळ्यामध्ये उर्फी जावेदचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने प्रसिद्ध तबला वादकाच्या मृत्यूवर विचित्र प्रतिक्रिया दिली आहे. उर्फीने सांगितले की झाकीर हुसेन कोण आहेत हे मला माहित नाही. उर्फी जावेद नेहमीप्रमाणे फोटो काढण्यासाठी सोमवारी संध्याकाळी मुंबईला पोहोचली होती. यावेळी ती तिच्या अनोख्या ड्रॅगन ड्रेसचे प्रदर्शन करत होती.

उर्फीला पाहिल्यानंतर तेथे उपस्थित पापाराझी नेहमीप्रमाणे फोटो काढण्यात व्यस्त असताना, त्यांनी चार ग्रॅमी पुरस्कार जिंकलेल्या पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनाबद्दल उर्फीला त्यांची प्रतिक्रिया देखील विचारली. पापाराझीने उर्फीला विचारले, “झाकीर हुसेन सर तुम्ही ओळखता का?”. यावर अभिनेत्रीने मान हलवली आणि ‘नाही’ असे उत्तर दिले. एक इशारा देत पापाराझी पुढे म्हणाले, ते एक महान गायक आहेत, ते एक संगीतकार आहेत. यावर उर्फीने चेहरा करुन तिला माहित नसल्याचे संकेत दिले. त्यानंतर ती घटनास्थळी उपस्थित असलेल्या तिच्या टीमशी बोलण्यात व्यस्त झाली आणि पापराजींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

आणखी वाचा – “मी तुझीच आहे आणि…”, नवऱ्याच्या वाढदिवसाला जिनिलीया देशमुखची रोमँटिक पोस्ट, शेअर केले Unseen Photos

View this post on Instagram

A post shared by Spotboye (@spotboye_in)

उर्फीच्या या प्रतिक्रियेने उस्ताद झाकीर हुसैन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले की, “हे चुकीचे आहे. निदान दिग्गज लोकांची माहिती तरी असावी”. तर दुसऱ्याने लिहिले, “उर्फी लखनऊची आहे. तिथूनच तिने शिक्षण घेतले आहे. त्यामुळे तिला इतकी माहिती असायला हवी होती”. कुटुंबीयांच्या मते, उस्ताद झाकीर हुसेन इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसने ग्रस्त होते. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांनी सोमवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी अखेरचा श्वास घेतला.

आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, पारंपरिक दागिना घडवण्यासाठी गाठलं सोनाराचं दुकान, साधेपणाचं कौतुक

झाकीर हुसेन यांना प्रतिष्ठेच्या ग्रॅमी पुरस्कारासाठी एकूण सात वेळा नामांकन मिळाले होते. यापैकी त्याने चार वेळा ग्रॅमी जिंकले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी असून ते देखील प्रसिद्ध तबलावादक होते. त्यांच्या आईचे नाव बीवी बेगम होते. मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमध्ये शिकलेल्या झाकीर हुसेन यांनी शहरातील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. जेव्हा त्यांनी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला तेव्हा ते फक्त ११ वर्षांचे होते.

Tags: bollywood newsurfi javedUrfi Javed  Troll
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Raj Kundra On Pornography

"एकतरी मुलीने माझं नाव घेऊदत तरच…", पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "मी फक्त सॉफ्टवेअर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.