शुक्रवार, जून 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आईच्या मृतदेहासमोर दोन भावांमध्ये राडा, लेक चितेवर झोपला अन्…; स्मशानभूमीत पुढे असं काही घडलं की…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 16, 2025 | 12:25 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
brothers fight at mothers funeral

Video : आईच्या मृतदेहासमोर दोन भावांमध्ये राडा, लेक चितेवर झोपला अन्...

२१व्या शतकात जगत असताना माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. अत्याचार, शारिरीक शोषण, जन्मदात्या आई-वडिलांचा छळ, खून अशा अनेक घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर अशी बरीच प्रकरणं समोर येतात. आता अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आईचं निधन झाल्यानंतर चांदीच्या बांगड्यांसाठी भांडणं करणारी भावंड आणि त्यांचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. आईचा मृतदेह स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कारासाठी आणण्यात आला. यावेळी दोन भावंडांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली. यामागचं कारण होतं ते फक्त चांदीच्या बांगड्या. ज्या आईने जन्म दिला, प्रेमाने वाढवलं आज त्याच मुलांनी हा दिवस दाखवणं म्हणजे लज्जास्पद होतं. पुढे मुलांनी असं काही केलं की, गावातील लोकांनाही मध्यस्ती करावी लागली. (brothers fight at mothers funeral)

नक्की प्रकार काय?

जयपूरमध्ये लीला गावात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर गावातील मंडळी व नातेवाईक जमले. त्या महिलेच्या अंत्यसंस्काराचीही संपूर्ण तयारी झाली. तिची दोन मुलं, कुटुंब, गावकरी स्मशानभूमीकडे निघाले. अंत्यविधीसाठी लागणारी सगळी तयारी तिथे करण्यात आली होती. अग्नी देण्यासाठी लाकडांची रचना करण्यात आली. मात्र या दुःखद प्रसंगी काही भलतंच घडलं. मृत महिलेच्या दोन्ही मुलांनी वादाला सुरुवात केली. चांदीच्या बांगड्यांवरुन हा वाद सुरु झाला. त्यानंतर समोर आलेलं दृश्य लज्जास्पदच होतं.

आणखी वाचा – झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

पाहा व्हिडीओ

#जयपुर #शाहपुरा के पास लीलो की ढाणी की घटना कलयुगी बेटे ने अपनी माता के अंतिम संस्कार में रोड अटकाए एवं खुद चिता पर लेट गया।
चांदी के कड़ों के बंटवारे को लेकर हुआ विवाद, बाद में लोगों की समझाइश से अंतिम संस्कार हुआ। pic.twitter.com/m6UZoCe9vf

— Manish Basniwal (@ManishBasniwal) May 15, 2025

मृत महिलेचा मुलगा स्वतःच्याच आईच्या चितेवर झोपला. काही केल्या तो चितेवरुन उठेना. त्याचा दुसरा भावही भांडू लागला. जन्मदाती आई गेल्यानंतर होणारं दुःख तर बाजूलाच पण त्यांची विकृती यामधून दिसून आली. आईच्या चितेवर झोपल्यानंतर गावकऱ्यांनी व कुटुंबातील इतर मंडळींनी मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने तो चितेवरुन उठला. त्यानंतर अंत्यसंस्काराची पुढील प्रक्रिया करण्यास सुरुवात झाली.

आणखी वाचा – दीपिका कक्करला गंभीर आजार, लवकरच मोठी शस्त्रक्रिया होणार, नवरा म्हणाला, “विकृतात…”

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कायमची शांतपणे झोपणाऱ्या त्या आईला नक्की काय वाटलं असेल? याचीही कल्पना करणं कठीण होतं. आईला शांतपणे शेवटचा निरोप देण्याऐवजी दोन्ही भाऊ एकमेकांना शिवीगाळही करत होते. आईला चितेवर ठेवायला जाणार तोच मुलांनी पुन्हा राडा करायला सुरुवात केली. मात्र इतरांच्या मध्यस्तीने त्या मातेला अखेरचा निरोप देण्यात आला. या व्हिडीओनंतर अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. अशी मुलं असण्यापेक्षा नसलेलीच बरी असं मत कमेंटद्वारे मांडत आहेत.

Tags: trending newstrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
april may 99 marathi movie trailer

मैत्री, जिव्हाळा अन् कोकणातील धमाल; ‘एप्रिल मे ९९’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.