सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

थायलंडमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे आगीशी खेळ, व्हिडीओ पाहून नेटकरीही भटकले, म्हणाले, “मृत्यूशी खेळ का?”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 23, 2025 | 5:41 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
TV actress Nia Sharma shared some pictures of her adventure sports from her Thailand trip on social media

निया शर्माने तिच्या थायलंड ट्रीपमधील खास फोटो केले शेअर, आगीशी साहसई खेळ खेळताना दिसली अभिनेत्री

आपल्या बोल्ड आणि बिनधास्त फोटो व व्हिडीओमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. निया शर्मा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातक तिने तिच्या थायलंड ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने या ट्रीपदरम्यान काही साहसी खेळदेखील खेळले आणि या साहसी खेळांचीही खास झलक तिने आपल्या या इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. (nia sharma thailand trip)

नियाने सोशल मीडियावर तिच्या साहसांची झलक शेअर केली आहे, ज्यात तिच्या आगीवर उडी मारणे आणि स्टंट करणे या व्हिडिओंचा समावेश आहे. या स्टंट्ससोबतच तिने आपल्या जखमी गुडघ्यांचे फोटोही पोस्ट केली आहेत. या खास फोटोंच्या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिले आहे की, “आगीशी खेळण्याची माझी पद्धत थोडी अनौपचारिक आहे. प्रत्येक सहलीला मला जखम होणे हे गरजेचे आहे.” तिची ही पोस्ट पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

आणखी वाचा – सासूबाईंच्या आजारपणात अलका कुबल यांनी केली सेवा, आयुष्यभर अभिनेत्रीलाही लेकीसारखं सांभाळलं, म्हणाल्या, “त्यांची सेवा करणं…”

छंद असण्याची गरज नाही, खतरों के खिलाडी शोची निया विजेती आहे”, जर त्या गोष्टी करता येत नाही तर ओव्हर अॅक्टींग का करता?”, “उगाच नको ते धाडस का करता” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी नियाचे कौतुक केलं आहे. दरम्यान, निया शर्मा तिच्या थायलंड ट्रिपनंतर चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर काहींनी तिचा कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र तिच्या या कृतीला मूर्खपणा म्हटलं आहे.

आणखी वाचा – “बॉलिवूडने मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं”, स्वरा भास्करचा मोठा दावा, आरोप करत म्हणाली, “खूप दुःख वाटलं कारण…”

दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नियाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने २०१० मध्ये ‘काली – एक अग्निपरीक्षा’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’ आणि ‘नागिन ४’ सारख्या शोद्वारे प्रसिद्धी मिळवली. तिने ‘खतरों के खिलाडी ८’ आणि ‘झलक दिखला जा १०’ या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
manisha koirala on age

वाढतं वय, लूकमुळे बॉलिवूडमध्ये मनिषा कोइरालाला टोमणे, अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, "म्हातारी म्हणून हिणवतात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.