आपल्या बोल्ड आणि बिनधास्त फोटो व व्हिडीओमुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. निया शर्मा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातक तिने तिच्या थायलंड ट्रीपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिने या ट्रीपदरम्यान काही साहसी खेळदेखील खेळले आणि या साहसी खेळांचीही खास झलक तिने आपल्या या इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. (nia sharma thailand trip)
नियाने सोशल मीडियावर तिच्या साहसांची झलक शेअर केली आहे, ज्यात तिच्या आगीवर उडी मारणे आणि स्टंट करणे या व्हिडिओंचा समावेश आहे. या स्टंट्ससोबतच तिने आपल्या जखमी गुडघ्यांचे फोटोही पोस्ट केली आहेत. या खास फोटोंच्या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिले आहे की, “आगीशी खेळण्याची माझी पद्धत थोडी अनौपचारिक आहे. प्रत्येक सहलीला मला जखम होणे हे गरजेचे आहे.” तिची ही पोस्ट पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.
छंद असण्याची गरज नाही, खतरों के खिलाडी शोची निया विजेती आहे”, जर त्या गोष्टी करता येत नाही तर ओव्हर अॅक्टींग का करता?”, “उगाच नको ते धाडस का करता” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी नियाचे कौतुक केलं आहे. दरम्यान, निया शर्मा तिच्या थायलंड ट्रिपनंतर चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टवर काहींनी तिचा कौतुक केलं आहे. तर काहींनी मात्र तिच्या या कृतीला मूर्खपणा म्हटलं आहे.
आणखी वाचा – “बॉलिवूडने मला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं”, स्वरा भास्करचा मोठा दावा, आरोप करत म्हणाली, “खूप दुःख वाटलं कारण…”
दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नियाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने २०१० मध्ये ‘काली – एक अग्निपरीक्षा’ मधून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘जमाई राजा’ आणि ‘नागिन ४’ सारख्या शोद्वारे प्रसिद्धी मिळवली. तिने ‘खतरों के खिलाडी ८’ आणि ‘झलक दिखला जा १०’ या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.