चंदेरी दुनियेत टिकून राहण्यासाठी जीवाचं रान करणारी मंडळी आणि त्यांच्या यशाला एक वेगळीच चमक असते. कष्टाला पर्याय नाही हे कलाकारांनीही फार पूर्वीच अगदी चोख ओळखलं आहे. ही रंगीत दुनिया बाहेरुन दिसायला जितकी आकर्षक असते तितकंच अनेक गुढ यामध्ये लपले आहेत. कित्येकदा तर अभिनेत्रींचं शारीरिक शोषण, गैरवर्तन अशा कित्येक घटना समोर येतात. काही वर्षांपूर्वी मीटू चळवळीमुळे तर इंडस्ट्रीचं काळं सत्य समोर आलं होतं. यामध्ये साजिद खानवरही अनेक आरोप करण्यात आले होते. आता पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला आहे. (tv actress allegations on sajid khan)
कपडे काढण्यास सांगितलं अन्…
साजिद खाने घरी बोलावत गैरवागणूक दिली असल्याची तक्रार सुप्रसिद्ध अभिनेत्री नवीना बोलेने केली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने याबाबत खुलासा केला आहे. नवीना म्हणाली, “साजिदने घरी बोलावलं आणि चुकीची मागणी केली. २००४ ते २००६ दरम्यानची ही गोष्ट आहे. ‘हे बेबी’ चित्रपटासाठी ते कलाकारांची निवड करत होते. त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की, कपडे काढ आणि अंतर्वस्त्रांमध्ये बस”.
आणखी वाचा – मॅगी खाताना नवऱ्याला मारलं, ते पाहून पत्नीने दहशतवाद्यांकडे मरण मागितलं अन्…; पहलगाममध्ये नववधूने फोडला टाहो
पुन्हा घरी बोलावलं तेव्हा…
पुढे ती म्हणाली, “कपडे काढून अंतर्वस्त्रांमध्ये बसणं नीट जमतं की नाही हे त्यांना बघायचं होतं. एक वर्षांनंतर पुन्हा त्यांनी माझ्याशी संपर्क केला. तेव्हा मी मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये सहभाग घेत होती. तेव्हा ते मला म्हणाले की, एका भूमिकेसाठी तू मला भेटायला येऊ शकते का?. वर्षभरापूर्वी तो माझ्याबरोबर जे वागला याचा त्याला बहुतेक विसर पडला”. नवीनाने अगदी बेधडकपणे तिला आलेला विचित्र अनुभव सांगितला. साजिद सारख्या व्यक्तीकडून हे कृत्य घडणं खरंच चीड आणणारं आहे.
आणखी वाचा – अपघातानंतर परेश रावल प्यायचे स्वतःचीच लघवी, अभिनेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “बियरसारखी लघवी प्यायचो कारण…”
नवीनाने तिची बाजू मांडली मात्र साजिदने याबाबत काहीही बोलणं टाळलं आहे. नवीना मालिकाविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘सीआयडी’, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘बालवीर’, ‘इश्कबाज’ सारख्या मालिकांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली. शिवाय वेबसीरिजमध्येही तिने काम केलं आहे. साजिदचंही बॉलिवूडमध्ये नाव मोठं आहे. मात्र शारिरीक शोषण, मीटू चळवळीमध्ये त्याचं नाव सतत पुढे आलं. आता पुन्हा झालेल्या आरोपांवर साजिद भाष्य करणार का? हे पाहावं लागेल.