शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्या नवऱ्याने सोडलं, नंतर सहकलाकाराबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेत्रीने थाटला संसार, इस्लाम धर्मही स्वीकारला अन्…; आता कसं जगते आयुष्य?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 4, 2024 | 5:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dipika kakar Income

पहिल्या नवऱ्याने सोडलं, नंतर सहकलाकाराबरोबरच सुप्रसिद्ध अभिनेत्रीने थाटला संसार, इस्लाम धर्मही स्वीकारला अन्...; आता कसं जगते आयुष्य?

टेलिव्हिजन विश्वात तसेच बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत काम करत असताना खूप प्रसिद्धी मिळवली. मात्र कालांतराने या अभिनेत्री त्यांच्या संसारात रमल्या वा काहींनी लग्नानंतर यशस्वी करिअरला रामराम ठोकला. तीन वर्षे एअर होस्टेस म्हणून काम केल्यानंतर अभिनेत्री दीपिका कक्करला वयाच्या २४व्या वर्षी ‘नीर भरे तेरे नैना देवी’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात ब्रेक मिळाला. त्यानंतर ‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय मालिकेमधून अभिनेत्रीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. (Dipika kakar Income)

दीपिका कक्करने ‘ससुराल सिमर का’ मालिकेमध्ये जवळपास सहा वर्षे काम केले. या मालिकेनंतर ही अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्रींपैकी एक बनली. रिपोर्ट्सनुसार, दीपिका तिच्या काळात प्रति एपिसोड ७०,००० रुपये इतके मानधन घेत होती. दीपिकाचे लग्न २०११ मध्ये रौनक सॅमसन यांच्यासह झाले होते. पण चार वर्षांनी दोघांनाही घटस्फोट घेत त्यांनी हे नातं संपवलं.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेला दत्तगुरुंचं वेड, माणगांवमध्ये दत्तमंदिरात भजन गात असताना भाविकांचीही तुफान गर्दी, कौतुकाचा वर्षाव

View this post on Instagram

A post shared by Dipika (@ms.dipika)

घटस्फोटानंतर दीपिका शोएबच्या जवळ आली आणि त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली. शोएबने मालिका सोडल्यानंतर दीपिकाला तिच्या प्रेमाची जाणीव झाली. मग एके दिवशी दोघांनीही आपलं प्रेम व्यक्त केलं. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी २०१८ साली लग्न केले. शोएबबरोबर लग्न करण्यासाठी दीपिकाने इस्लामचा स्वीकार केला होता. त्यामुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात आले.

आणखी वाचा – “तुझं दुसरं लग्न म्हणून पुन्हा विवाह करण्यास वेळ घेतलास का?”, आस्ताद काळेबरोबर संसार थाटण्याबाबत स्वप्नालीचं भाष्य, म्हणाली, “त्याच चुका मला…”

दीपिका फैजा बनल्यानंतर ही अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. दीपिका रिॲलिटी शो ‘बिग बॉस १२’ची विजेती देखील आहे. दीपिका बऱ्याच दिवसांपासून सिनेविश्वापासून गायब आहे. दीपिका कक्कर अभिनयापासून दूर असली तरी ती तिच्या व्हिडीओद्वारे तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. दीपिका व शोएबने २०२३मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले. दीपिका व शोएब आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट व्हिडीओद्वारे चाहत्यांशी शेअर करत असतात. चाहतेही या जोडीवर भरभरुन प्रेम करताना दिसतात.

Tags: diika kakarDipika Kakar and shoeb ebrahimDipika kakar Incomedipika kakar tv actressentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Mahesh Manjrekar's son Satya shared his gym video on social media see the details.

महेश मांजरेकरांच्या लेकाला पाहिलंत का?, आता बदलला आहे लूक, हॉटेल सांभाळत जिममध्ये करत आहे मेहनत, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.