मनोरंजन सृष्टीतील काम करण्याऱ्या कलाकारांचे आयुष्य हे दुरून परिपूर्ण दिसते. पण पडद्यामागे काय घडते हे फक्त त्या कलाकारांनाच माहिती असते. कलाकारांना काम मिळवण्यासाठी आणि ते करण्यासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष म्हणजे मुख्यत: कास्टिंग काउच. हे विशेषतः अभिनेत्रींबरोबर अनेकदा घडते. झगमगत्या विश्वातील ग्लॅमरमागे सेलिब्रिटींना अनेक वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. याबद्दल पूर्वी अभिनेत्री भाष्य करत नसत, पण आता मात्र त्या स्वत: पुढे येऊन याबद्दल उघडपणे सांगतात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचसारख्या प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. यात अभिनेत्री विद्या बालनचाही समावेश आहे. (vidya balan casting couch experience)
विद्या बालनने एका मुलाखतीदरम्यान दिग्दर्शकाच्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितले होते. ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत विद्या म्हणाली होती की, “मी कधीही कास्टिंग काउचचा सामना केला नाही. मी खूप भाग्यवान आहे. मी याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत आणि हीच माझ्या पालकांची सर्वात मोठी भीती होती. पण माझ्याबरोबर एक घटना घडलेली… मला आठवतंय की, मला एका चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकाला भेटायचं होतं. त्यावेळी मी एका जाहिरात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चेन्नईला जात होते”.
आणखी वाचा – 07 February Horoscope : नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांसाठी शुक्रवारचा दिवस संमिश्र, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…
विद्या पुढे म्हणाली, “एक दिग्दर्शक मला भेटायला आला होता. मी त्याला सांगितले की, चला कॉफी शॉपमध्ये बसूया. पण तो आग्रह करू लागला की त्याला माझ्याशी बोलायचे आहे आणि आपण खोलीत जाऊ. मला समजले नाही, कारण मी एकटी होते. पण मी शहाणपणाने वागले. आम्ही खोलीत गेलो तेव्हा मी दार उघडे ठेवले. आणि त्याला माहित होते की, त्याच्याकडे फक्त एकच पर्याय होता, खोलीतून बाहेर पडणे. मग तो पाच मिनिटांत निघून गेला”. यानंतर, विद्या हसून म्हणाली, “आणि मग मला त्या चित्रपटातून काढून टाकण्यात आले”
आणखी वाचा – “प्रेक्षकांचे हे ऋण…”, पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफांनी मानले आभार, म्हणाले, “केंद्र सरकार…”
दरम्यान, विद्या बालनच्या चित्रपटांची अनेकदा चर्चा होते. पण फार कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी १९९५ मध्ये एका टीव्ही शोने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्या शोचे नाव होते ‘हम पाच’. यानंतर ती चित्रपटात दिसली. जो २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द डर्टी पिक्चर’साठी या अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.