शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन महिने हनिमून, लग्नाच्या वर्षभरामध्येच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर गंभीर आरोप, आता पतीनेच दिलं उत्तर, म्हणाला, “ती निघून गेली आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 30, 2024 | 12:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dalljiet Kaur Marriage Life

दोन महिने हनिमून, लग्नाच्या वर्षभरामध्येच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर गंभीर आरोप, आता पतीनेच दिलं उत्तर, म्हणाला, "ती निघून गेली आणि..."

टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. अलीकडे अभिनेत्री तिच्या दुस-या लग्नातील मतभेदामुळे चर्चेत आली होती. दलजीतने तिचा नवरा निखिल पटेलवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत. एवढेच नाही तर निखिलवर फसवणुकीचे अनेक आरोपही केले. मात्र, आता निखिल पटेल यांनीही दलजीत कौरच्या आरोपांवर आपले मौन सोडले आहे. त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासेही केले. (Dalljiet Kaur Marriage Life)

निखिल पटेल यांनी दलजीत कौरच्या आरोपांना उत्तर असं म्हटलं की, “या वर्षी जानेवारीमध्ये दलजीतने मुलगा जेडेनबरोबर केनिया सोडून भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही वेगळे झालो. आम्हा दोघांना कळले की, आमच्या कुटुंबाचा पाया आमच्या अपेक्षेइतका मजबूत नाही. दलजीतला केनियात राहणे कठीण झाले. दलजीतला केनियातील तिच्या आयुष्याशी जुळवून घेता आले नाही”.

आणखी वाचा – साक्षीवरील आरोप सिद्ध करत अर्जुनने मारली बाजी, मधुभाऊंची या केसमधून करणार सुखरूप सुटका, मालिकेत रंजक वळण

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

या नात्यावरील मौन सोडत निखिल म्हणाले, “माझ्या कारकिर्दीची आणि भारतातील आयुष्याची आठवण ठेवून दलजीत व आमचे कुटुंब अधिक दूर झाले. आम्हा दोघांच्या संस्कारामुळे अनेक गोष्टी अवघड होत होत्या. माझ्या मुलींची एक आई आहे जी त्यांच्यातील नातेसंबंधांची पर्वा न करता निघून गेली. दलजीतने ज्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी तिने मला आणि तिच्या मुलाच्या शाळेत सांगितले की, तिचे उरलेले सामान घ्यायला फक्त ती केनियाला येणार आहे”.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण, बायको व लेक दिसते इतकी सुंदर, शेअर केलेल्या फॅमिली फोटोची चर्चा

इतकंच नाही तर निखिल असंही म्हणाला की, “माझ्यासाठी दलजीत केनियाहून भारतात परत जाणं म्हणजे आमचं नातं संपल्यासारखं आहे”. ‘बिग बॉस १३’ फेम दलजीत कौरने गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत केनियास्थित व्यावसायिक निखिल पटेलबरोबर लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर वर्षभरातच दलजीत व निखिलच्या नात्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या. गेल्या शनिवारी दलजीतने इन्स्टास्टोरीद्वारे निखिलबरोबर विभक्त झाल्याची पुष्टी केली होती. काही महिन्यांपूर्वी दलजीत व निखिलनेही एकमेकांना अनफॉलो केले.

Tags: daljit kaur husbandDalljiet Kaur Marriage Lifeentertainmentnikhil patel on his marrigae
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Next Post
Titeeksha Tawde Mothers Home

Video : स्वयंपाकघर, छोटाच हॉल अन्…; डोंबिवलीमध्ये इतकं साधं पण तितकंच सुंदर आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं घर, पाहा Inside Video

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.