शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आठ वर्षांचा सुखी संसार; लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्याबद्दल भरभरुन बोलली ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची पत्नी, म्हणाली, “ हे सुंदर आयुष्य…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 31, 2025 | 12:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hrishikesh Shelar Wife Shared Special Post

आठ वर्षांचा सुखी संसार; लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्याबद्दल भरभरुन बोलली 'तुला शिकवीन...' फेम अभिनेत्याची पत्नी, म्हणाली, “ हे सुंदर आयुष्य…”

Hrishikesh Shelar Wife Shared Special Post : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षकवर्गाने भरभरुन प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला. ही मालिका फार कमी वेळातच रसिकांच्या पसंतीस आली. या मालिकेतील अक्षरा-अधिपती या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. मालिकेत अधिपती ही भूमिका हृषीकेश शेलार याने साकारली आहे. सध्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी ही मालिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. विशेषतः मालिकेतील अधिराजला त्याचे चाहते मिस करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हृषीकेश नेहमीच संपर्कात राहत असतो. अशातच हृषीकेशची एक वैयक्तिक पोस्ट सध्या साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेता व्यावसायिक नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हृषीकेशच्या लग्नाला आज आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हृषीकेशने खास पोस्ट शेअर करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेत्याच्या पत्नीने स्रेहाने दिलेले कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे. स्नेहाने हृषिकेशला उद्देशून लिहिले, “आपल्या या प्रवासाला ८ वर्षे झाली. आपण आजच्या युगातले आहोत. पण, तरीही स्वभावाने ९०च्या काळात रमतो. ७० आणि ८० च्या दशकातील गाणी आपल्याला फार जवळची वाटतात. ब्लॅक अँड व्हाईट गाण्यांबरोबर असंच रंगीबेरंगी आयुष्य जगूया”.

आणखी वाचा – हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात, नेपाळ बॉर्डरवर केलं अटक, वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केली आणि…

View this post on Instagram

A post shared by Sneha Ashok Mangal(KATE) (@sneha_ashokmangal14)

पुढे तिने लिहिलं आहे की, “आता तर आपलं आयुष्य रुहीच्या अवतीभोवती फिरतंय. अशीच एकमेकांना साथ देत, प्रोत्साहन देत हे सुंदर आयुष्य एकमेकांसमवेत घालवूयात. लव्ह यू, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.” स्नेहाच्या या पोस्टवर अभिनेत्री शिवानी रांगोळेने कमेंट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. तर हृषिकेशनेदेखील स्नेहाबरोबरचे काही फोटो शेअर करत एकमेकांबरोबरची ८ वर्षे असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – नणंदेकडून तितीक्षा तावडेला खास सरप्राइज, गिफ्ट पाहून भारावली अभिनेत्री, खास व्हिडीओ समोर

हृषिकेशची पत्नी स्नेहा ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. दोघांच्या लग्नाचीही बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. दोघांनी अत्यंत साधेपणाने लग्नसोहळा उरकला. पारंपरिक अंदाजात ही जोडी विवाहबंधनात अडकली. हृषिकेश व स्नेहा यांच्या लग्नाची चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. स्नेहा काटे ही अभिनयाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच अभिनेता हृषीकेश शेलारसह लग्नबंधनात अडकली.

Tags: entertainmenthrishikesh shelarmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Pakistani actress hina Khawaja bayat video on real situation pakistan

पाणी नाही, वॉशरुमला जायची सोय नाही अन्...; पाकिस्तानी अभिनेत्रीनेच दाखवली कराची एअरपोर्टची अवस्था, व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.