शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बजरंग जेलमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्येच असल्याचे सत्य अक्षरा सर्वांसमोर आणणार, भुवनेश्वरीचाही खरा चेहरा समोर?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 25, 2024 | 2:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial updates Akshara will plan against Bhuvneshwari and Bajrang and bring out their real truth.

अक्षरा भुवनेश्वरी व बजरंगविरुद्ध प्लॅन करुन त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार, यश मिळेल का?

तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत चारुलताची एन्ट्री झाल्यापासून मालिकेला एक वेगळंच वळण आलं आहे. अक्षराने स्वत:हून तिला घरी आणलं होतं. यानंतर अक्षराला चारुलता व भुवनेश्वरी यांच्यातील सत्य समजते. काही दिवसांपूर्वी बाजारात अक्षराला चारुलता भुवनेश्वरी असल्याचा भास होतो आणि त्यानंतर ती हे घरातील सर्वांना सांगते. पण तिने हे सगळ्यांना सांगितल्यानंतर घरातील सर्व तिला वेडी ठरवतात. यामुळे भुवनेश्वरी तिला प्लॅन करुन हॉस्पिटलमध्ये दाखल करते. (Tula Shikvin Changalach Dhada Serial Updates)

चारुलता भुवनेश्वरी असल्याबद्दल कुणालाच काहीही कल्पना नाही आणि तिच्या याच जाळ्यात सूर्यवंशी कुटुंबीय अडकले आहेत. एकीकडे अक्षरा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे, तर दुसरीकडे भुवनेश्वरी तिची चाल खेळणार आहे एकीकडे अक्षरा रुग्णालयात असताना दुसरीकडे, घरात भुवनेश्वरी आणि चारुहासच्या लग्नाचा घाट घालण्यात येतो. सुनेच्या अनुपस्थितीत लग्न व्हावं अशी चारुहासची अजिबात इच्छा नसते. पण, चारुलता (भुवनेश्वरी) त्याचं मतपरिवर्तन करण्यात यशस्वी होते. 

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेच्या सोमवारच्या भागात अधिपती अक्षराला भेटायला गेला असताना टी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. यावेळी अक्षरा अधिपतीला भुवनेश्वरी चारुलता बनून सर्वांची फसवणूक करट असल्याचे सांगते. मात्र या अक्षराने या सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावे असं सांगतो. तसंच यावेळी अक्षरा अधिपतीला बजरंगविषयीही सांगते. मात्र अधिपती बजरंग जेलमध्येच असल्याचे तिला सांगतो. अशातच आता अक्षरा भुवनेश्वरीचा प्लॅन उधळून लावणार आहे.

आणखी वाचा – गोविंदाबरोबरचा कृष्णा अभिषेकचा वाद मिटला, पण मामी अद्यापही नाराज, म्हणाला, “माफी मागितली तरीही…”

बजरंग हॉस्पिटलमध्येच आहे हे सिद्ध करण्यासाठी अक्षरा आता नवीन प्लॅन करणार आहे आणि या नवीन प्लॅनचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमध्ये बजरंग अक्षराच्या खोलीत येतानाचे पाहून ती त्याच्या नकळत फळांच्या डिशमध्ये मोबाइल लपवते. जेणेकरून तिच्याकडे बजरंगविरुद्ध पुरावा असावा. पुढे या प्रोमोमध्ये अक्षरा बजरंगला “हे सगळं तू एकट्याने कसं मॅनेज केलंस” असं विचारते. पुढे या प्रोमोमध्ये बजरंग अक्षराला उत्तर देताना असं म्हणतो की, “हे सगळं एकट्याचं काम नाही”.

आणखी वाचा – तितीक्षा तावडेचा नवा विक्रम, युट्यूबकडून अभिनेत्रीचा सन्मान, म्हणाली, “२०२३मध्ये चॅनल सुरु केलं आणि…”

यावर अक्षरा त्याला असं म्हणते की, “तुला कोण मदत करणार आहे?” यावर बजरंगच्या तोंडून भुवनेश्वरी हे नाव येते. पण तो ते नाव अर्धच घेतो आणि थांबतो. यावरुन अक्षराला भुवनेश्वरीच्या प्लॅनची कल्पना येते. त्यामुळे आता अक्षरा बजरंगचा खरा चेहरा लोकांसमोर आणणार का? या सगळ्यात त्याच्याबरोबर भुवणेश्वरी असल्याचे ती सिद्ध करणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.  

Tags: Marathi Serial NewsTula Shikvin Changalach Dhada Marathi Serial UpdatesTula Shikvin Changalach Dhada Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Abhishek Bachchan On Aishwarya Rai

ऐश्वर्या रायबाबत अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, नात्याबाबत स्पष्टच बोलला, म्हणाला, "मी बाहेर काम करतो आणि ती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.