‘झी मराठी’ वाहिनीवर साधारण एक वर्षांपूर्वी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. दमदार स्टारकास्ट आणि रंजक कथानकाच्या जोरावर या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेतील अक्षरा-अधिपतीच्या जोडीला प्रेक्षकांनी लगेच आपलंसं करून घेतलं. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारत आहे. तर, अधिपतीच्या भूमिकेत अभिनेता ऋषिकेश शेलार झळकत आहे. काहीच दिवसांआधी अक्षराने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. अधिपतीवर आपलं प्रेम असल्याचं तिने मान्य केलं आहे. त्यामुळे अक्षरा-अधिपती या दोघांमधलं नातं आता बहरतं आहे. मात्र या दोघांमध्ये आता भुवनेश्वरी अडथळा आणत आहे.
नुकतेच भुवनेश्वरीने अधिपती-अक्षरा यांना घराच्या बाहेर काढले आणि त्यांना त्यांचा संसार करायला सांगितले आहे. यानंतर अधिपती व अक्षरा यांनी त्यांच्या नव्या संसारालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे अधिपती-अक्षरा यांच्या संसारासाठीचा आटापिटा सुरु आहे. पैशांसाठी ते काही ना काही प्रयत्न करत आहेत. अधिपती जास्त पैसे मिळण्यासाठी काहीतरी काम मिळालं पाहिजे असं म्हणत कुस्ती खेळतो. यात त्याला २५ हजार म्हणून बक्षीस मिळतात. मात्र हेच पैसे चोरीला जातात.
आणखी वाचा – जब्याला शालू पटली! ‘फँड्री’ फेम राजेश्वरी-सोमनाथ यांचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, चाहते म्हणाले, “तुम्ही लग्न…”
नुकताच या नवीन ट्विस्टबद्दलचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात अधिपती-अक्षरा राहत असलेल्या घरातील सामानाची नासधूस झालेली पाहायला मिळत आहे. घरातील डब्बे अस्ताव्यस्त पसरले असून त्यांनी ज्या डब्यात पैसे ठेवलेले असततात, तो डब्बाही पडलेला दिसतो. अधिपती-अक्षराच्या घरात ही चोरी भुवनेश्वरीने घडवून आणली आहे. भुवनेश्वरी दुर्गेश्वरीच्या मदतीने ही चोरी घडवून आणते.
दरम्यान, अधिपती-अक्षरा आपल्या परीने संसार करण्याचा प्रयत्न करत आहे. कामावलेले पैसे चोरीला गेल्यामुळे आता यापुढे काय करावं असा प्रश्न दोघांना पडला आहे. अशातच आता ही चोरी भुवनेश्वरीने करवून आणली असल्याचे दोघांना कळणार का? पैसे चोरीला गेल्यामुळे अधिपती-अक्षरा यांचा पुढचा मार्ग काय असणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.