‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एका मागो माग एक रंजक वळणे येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत सध्या अधिपतीला गायन शिकवण्यास सुरुवात झालेली असते. चारुहास व अक्षरा अधिपतीला गाणं शिकता यावं म्हणून भुवनेश्वरीकडून परवानगी घेतात. अधिपतीची गायनकला जोपासण्यासाठी अक्षरा खूप मेहनत घेत असते. त्यानंतर अक्षरा गाणं शिकवणाऱ्या एका शिक्षिकेला घरीही बोलावते पण भुवनेश्वरी त्या शिक्षिकेला इथे कोणाला गाणं शिकायचं नाही, असं सांगून परतून लावते. (tula shikvin changlach dhada serial update)
त्यानंतर भुवनेश्वरी नवी चाल खेळून स्वतः अधिपतींना गाणं शिकवण्यासाठी शिक्षिका आणते. त्यामुळे मालिकेत सरगम मॅडमची मालिकेत एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सानिया चौधरी ही मालिकेत सरगमची भूमिका साकारत आहे. सरगम मॅडम आल्यानंतर अधिपतीच्या शिकवणीला सुरुवात होते. सरगम मॅडम व अधिपती एकत्र बसून शिकवणीच्या आधी गप्पा मारत असतात ते पाहून अक्षरा त्यांच्यावर चिडत म्हणते की, आता तुमच्या गप्पा झाल्या असतील तर शिकवणीला सुरुवात करायची का?.
तर एकीकडे अधिपती सरगम मॅडम यांना मास्तरीन बाई म्हणालेला असतो. त्यामुळे अक्षरा अधिपतीवर रागावलेली असते. ती अधिपतीला सक्त ताकीद देते की, मास्तरीन बाई या शब्दावर फक्त माझा अधिकार आहे. असं ती त्याला दटावून सांगते. त्यानंतर अधिपती अक्षराचे आभार मानतो. अक्षरामुळे अधिपतीला गाणं शिकता येणार असतं त्यामुळे तो अक्षराला थँक यु असंही म्हणतो.
तर इकडे शिकवणी झाल्यानंतर भुवनेश्वरी सरगम मॅडमना बोलावून घेते. सरगम मॅडमना बोलावून ती सांगते की, “आता तुम्ही शिकवणी तर सुरु केली आहे, आता हळूहळू तुम्ही अधिपती यांच्या मनातही जागा मिळवायचं बघा. त्यांच्या मनाचा ताबा घ्या”. भुवनेश्वरीने सरगमला आणून खूप मोठी चाल आखलेली असते. आता भुवनेश्वरीचा हा नवा डाव अक्षरा ओळखणार का?, की अक्षराचं सरगमची शिकवणी घेणार?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.