शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अधिपतीच्या मास्तरीण बाई बनल्या शेतकरी, शेतात काम करतानाचा फोटोही केला शेअर, प्रेक्षक म्हणाले, “विषय हार्ड…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 3, 2024 | 5:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada serial fame actress Shivani Rangole shared photo in farmer look

अधिपतीच्या मास्तरीण बाई बनल्या शेतकरी, शेतात काम करतानाचा फोटोही केला शेअर, प्रेक्षक म्हणाले, "विषय हार्ड…"

छोट्या पडद्यावरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. मालिकेत अक्षरा-अधिपती यांची जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी बनली आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरला आहे. त्यातच मालिकेतील भुवनेश्वरी आणि अधिपतीबरोबरच अक्षरानेही चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. मालिकेत ही भूमिका शिवानी रांगोळे साकारते आहे. त्यामुळे तीदेखील चाहत्यांमध्ये चर्चेत राहत असते. अशातच आता पुन्हा एकदा शिवानी सोशल मीडियावर चर्चेत आली आहे आणि याच कारण म्हणजे अभिनेत्रीने शेअर केलेला फोटो.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत शिवानी रांगोळे साकारत असलेल्या अक्षराच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिनयासह शिवानी सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील घडामोडी, सेटवरच्या गंमती-जमती नेहमीच सोशल मीडियावरुन शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेला एक फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत  आहे. शिवानीने तिच्या मालिकेतील खास लूकमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातात विळादेखील पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

आणखी वाचा – नम्रता संभेरावने जुन्नरमधील गावात बांधलं हक्काचं घर, इतकं प्रशस्त आणि मोठी आहे जागा, शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो

शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिचा हातात विळा घेतलेला आणि भगव्या रंगाची साडी नेसलेला अगदी गावरान फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो बघून चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. शिवानीच्या या फोटोवर चाहत्यांनी “आता कोल्हापूरकर म्हणून शोभत आहात”, “मास्तरीन बाई, “विषय हार्ड केलाय की”, ‘मास्तरीन बाई झाल्या शेतकरीण”, “अप्रतिम” अशा अनेक कमेंट्स करत शिवानीच्या लूकचे कौतुक केलं आहे.  

आणखी वाचा – Video : पडद्यामागे तबला वाजवू लागले अरुण कदम, नाटकाच्या प्रयोगापूर्वी बॅकस्टेज धमाल, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, शिवानीचा हा लूक मालिकेतील आगामी भागाबद्दलचा असल्याचे म्हटलं जात आहे. भुवनेश्वरीने अधिपती व अक्षरा यांना घरातून बाहेर काढल्यानंतर दोघेही मिळेल ते काम करत आहेत. त्यामुळे आता मास्तरीनबाई शेतीदेखील करणार आहेत की? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.         

Tags: marathi entertainment newsshivani rangoletula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Titeeksha Tawde Birthday

लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, सुंदर फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.