रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, सुंदर फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2024 | 6:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde Birthday

लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, तितीक्षा तावडेचा आनंद गगनात मावेना, सुंदर फोटो समोर

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडे घराघरांत पोहोचली. या मालिकेतील अभिनयाशिवाय तितीक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीचं तितिक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात तितीक्षा व सिद्धार्थचं लग्न पार पडलं. लग्नाचे फोटो, व्हिडीओ ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे दोघांच्या फोटो व व्हिडीओला पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली. (Titeeksha Tawde Birthday)

आता लग्नानंतर तितीक्षाचा पहिला वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने तितीक्षासाठी शेअर केलेल्या खास पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टसह शेअर केलेल्या फोटोंवरुन सिद्धार्थने तितीक्षाचा वाढदिवस साजरा केला असल्याचं दिसत आहे. बलून्सचं डेकोरेशन करत रोमँटिक पोज देतानाचा फोटो त्याने शेअर केला आहे. तितीक्षा व सिद्धार्थ ही सिनेसृष्टीतील क्युट जोडीपैकी एक जोडी आहे.

आणखी वाचा – अधिपतीच्या मास्तरीण बाई बनल्या शेतकरी, शेतात काम करतानाचा फोटोही केला शेअर, प्रेक्षक म्हणाले, “विषय हार्ड…”

View this post on Instagram

A post shared by Siddharth Bodke (@siddharthbodkeofficial)

बायकोसाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या सुंदर, अविश्वसनीय पत्नीला आणि माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यातील व प्रेमातील माझा जोडीदार म्हणून तुझा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. तुझ्याबरोबरचा प्रत्येक दिवस ही एक भेट आहे आणि आज मी तुझा हा दिवस साजरा करत आहे. तू खूप सर्वोत्कृष्ट आहेस आणि इथे जे काही सर्वोत्तम आहे, त्या सर्वासाठी तू पात्र आहेस. तुझी प्रत्येक स्वप्ने पूर्ण होवोत. तुझी स्वप्ने आता माझी स्वप्ने आहेत. आणि आपण मिळून ही स्वप्ने सत्यात उतरुया”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पेणमधील घरात चोरी, ‘ते’ दृश्य पाहून आईला पॅरालिसीसचा अटॅक, म्हणाली, “आई-बाबा घरी पोहोचले तेव्हा…”

सिद्धार्थच्या या पोस्टवर तितीक्षाने कमेंट करत त्याचे आभारही मानले आहेत. तिने असं म्हटलं आहे की, “तू माझी सर्वात चांगला मित्र, माझा विश्वासू आणि माझा सर्वात मोठा आशीर्वाद आहेस. मी करु शकेन इतकं अंतहीन प्रेम तुझ्यावर आहे. तू माझं सर्वस्व आहेस. सर्वात अर्थपूर्ण आणि सर्वात प्रेमळ नवरा मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी तुझ्यावर प्रेम करते”.

Tags: marathi actormarathi actressTiteeksha Tawade And Siddharth BodkeTiteeksha Tawde Birthday
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
shabana azmi on hony irani

"आमच्या दोघांचं अफेअर सुरु असताना…", पहिलं लग्न झालं असूनही जावेद अख्तर यांनी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, शबाना म्हणाल्या, "त्यांनी मुलांचे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.