शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयकडून १ कोटीची मदत जाहीर होताच ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले, “तंत्रज्ञ कलावंतांसाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 15, 2024 | 2:05 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada fame Swapnil Rajshekhar shared a post on Facebook after BCCI announced Rs 1 crore to cricketer Anshuman Gaikwad.

क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयकडून १ कोटीची मदत जाहीर होताच ‘तुला शिकवीन...’ फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले, “तंत्रज्ञ कलावंतांसाठी...”

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज अंशुमन गायकवाड सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांना ब्लड कॅन्सर झाला असून ते लंडनमध्ये उपचार घेत होते. मात्र आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने ते बरोड्यात परतले आहेत आणि तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे बीसीसीआयने एक पाऊल पुढे येत त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयला अंशुमन गायकवाडला आर्थिक मदत देण्यासाठी तातडीने एक कोटी रुपये जारी करण्याचे निर्देश दिले. जय शाह यांनी गायकवाड यांच्या कुटुंबीयांशीही बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत जाहीर केली. याबाबत बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेने माहिती दिली.

अंशुमन गायकवाड यांना ही मदत जाहीर होताच या मदतीवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येता आहेत. अनेकांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे कौतुक केलं आहे. तर अनेकजण या निर्णयावर नाराज आहेत की काय असं वाटत आहे. याबद्दल एका मराठी अभिनेत्यानेही पोस्ट शेअर केली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील चारुहास म्हणजेच स्वप्नील राजशेखर यांनी पोस्ट शेअर केली आहे. स्वप्नील यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे याबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी ३’मधून ‘हा’ स्पर्धक घराबाहेर, शिवाय ‘हे’ स्पर्धकही ठरले नॉमिनेशनचे बळी, शोमध्ये चाललंय तरी काय?

या पोस्टद्वारे स्वप्नील यांनी असं म्हटलं आहे की, “क्रिकेटर अंशूमन गायकवाड यांना बीसीसीआयकडून उपचारासाठी १ कोटीची मदत मिळाली आहे. याचा खूप आनंद आहे. इथे वृद्ध तंत्रज्ञ कलावंतांसाठी हजारात रक्कम जमावताना धाप लागते”. या पोस्टद्वारे स्वप्नील यांनी बीसीसीआयच्या आर्थिक मदतीबद्दल कौतुक केलं असलं तरी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या मानधनाबद्दल. तसेच त्यांच्या निवृत्तीनंतरच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला स्वामींची प्रचिती, ‘तो’ प्रसंग सांगताना अभिनेता भावुक, म्हणाला, “गाडीत बसलेलो असताना…”

दरम्यान, अंशुमन गायकवाड यांनी भारताकडून खेळण्याबरोबरच त्यांनी संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले आहे. १९९७ ते १९९९ आणि पुन्हा २००० मध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. बीसीसीआयने गायकवाड यांच्या उपचारासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे.

Tags: Anshuman GaikwadAnshuman Gaikwad BCCI HelpSwapnil RajasekharTula Shikvin Changlach Dhadda Fame
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
deepika padukone and ranveer singh viral photo

लग्न अनंत-राधिकाचं पण चर्चा रणवीर-दीपिकाची, दीपिकाच्या 'त्या' कृतीमुळे चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.