‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अधिपती व अक्षरा यांचा प्रेमाचा प्रवास सुरु असलेला पाहायला मिळत आहे. अक्षरा-अधिपतीवरील प्रेमाची कबुली देणार असल्याचा मालिकेत सिक्वेन्स सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अधिपतीचा वाढदिवस असतो. तेव्हा अक्षरा अधिपतीला औक्षण करते मात्र अधिपती आजवर मला माझ्या वाढदिवसाला पहिलं औक्षण आईसाहेबच करतात, असं म्हणतो. अक्षरालाही वाईट वाटू नये म्हणून अधिपती तिच्याकडून औक्षण करुन घेतो. त्यानंतर अक्षराने अधिपतीसाठी आणलेलं सुंदर असं गिफ्ट म्हणजेच फॉर्मल शर्ट घालतो. (Tula shikvin Changalach Dhada Serial)
त्यानंतर अधिपतीसमोर अक्षरा प्रेमाची कबुली देत असते तितक्यात अधिपतीला कोणीतरी बोलावून घेतं. म्हणून अक्षरा व अधिपती यांच्यातील प्रेमाचा संवाद तिथेच थांबतो. त्यानंतर अधिपती खाली येतो तेव्हा अक्षराने आधीच औक्षण करुन तिने दिलेलं शर्ट घातल्याने भुवनेश्वरीचा संताप होतो. भुवनेश्वरी हे पाहून मुद्दाम अधिपतीसमोर नाटक करत अक्षराबाबत त्याच्या मनात द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करते.
भुवनेश्वरी म्हणते की, याआधी आम्ही तुम्हाला पहिलं औक्षण करायचो. मात्र आता तुमची बायको आली आणि तुम्ही बदललात. तुमच्यासाठी कापडं आणायला आम्ही उन्हातान्हात वणवण फिरलो. शंभर दुकान पालथी घातली. पण तुम्हाला मी आणलेल्या गिफ्टची काहीच काळजी नाही. असं म्हणत डोळ्यात पाणी आणतात. शिवाय त्या असेही म्हणतात की, यापुढे मी तुम्हाला कधीही कापडं आणणार नाही. तुमच्या बायकोलाचं ते सांगा. आजच्या या चांगल्या दिवशी मला असं वागायचं नव्हतं जाऊदे”, असं त्या म्हणतात.
हे ऐकून अधिपती नाराज होतो. अधिपती म्हणतो, “आईसाहेब आजवर मी तुमचा कधी शब्द मोडला आहे का?, मी तुम्ही आणलेली कापडं घालणार नाही असं बोललो का?, असं म्हणत तो ते कपडे उचलून घेऊन जातो. त्यानंतर चारुहास भुवनेश्वरीला योग्य चाल खेळल्यामुळे खूप सुनावतो. आणि अक्षराला कमी लेखण्यासाठी, अक्षराचा बदला घेण्यासाठी हे केलं असल्याचं बोलतात. तितक्यात भुवनेश्वरीने दिलेलं शर्ट घालून अधिपती येतो आणि चारुहासला ओरडतो. आईसाहेबांबद्दल असं काही बोलायचं नाही असं तो म्हणतो.