मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मनाला भिडणाऱ्या ‘तुला पाहता’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच, उलगडणार दोन पिढ्यांची प्रेमकहाणी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 1, 2026 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tula Pahata Marathi Movie

मनाला भिडणाऱ्या 'तुला पाहता' चित्रपटाचा ट्रेलर लाँच, उलगडणार दोन पिढ्यांची प्रेमकहाणी

Tula Pahata Marathi Movie : आजवर प्रेमकथा असलेल्या चित्रपटात एक प्रेमकहाणी दाखवली गेली. मात्र, ‘तुला पाहता’ या चित्रपटातून १९७१ आणि २०२६ या दोन काळांतील दोन प्रेमकहाण्या उलगडण्यात येणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात मुंबई येथे संपन्न झाला. याप्रसंगी सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट – प्रोग्रामिंग आणि डिस्ट्रिब्युशन मयांक श्रॉफ, सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत शेलार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. येत्या १० जुलैला हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी ‘तुला पाहता’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन मयुरा प्रधान यांचंच आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्याच चित्रपटासाठी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहित प्रधान यांनी ध्वनि आरेखन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शनाद्वारे साथ दिली आहे. चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांच्यासह नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

आणखी वाचा – १० वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटावर अखेर गौरव खन्ना स्पष्टच बोलला, म्हणाला, “आकांक्षाला शुभेच्छा आणि…”

‘तुला पाहता’ हे चित्रपटाचे टायटल मला खूप आवडले, चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर आणि मनाला भावणारा आहे. माझ्याकडून या चित्रपटाला मनःपूर्वक शुभेच्छा असे अभिनेते मुश्ताफ खान यांनी सांगितले. ऐन तारुण्यात, प्रेमात आकंठ बुडालेले असताना तो अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो आणि काही वर्षांनी तसाच अचानक परततो तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून.. त्याच्या अचानक जाण्यानं आणि पुन्हा परतण्यानं तिच्या आयुष्यात काय खळबळ उडते त्याची तरल कहाणी या चित्रपटातून आपल्याला पहायला मिळणार आहे. त्याशिवाय आताच्या काळातील एका तरुण जोडप्याची प्रेमकथा ‘तुला पाहता’ या चित्रपटातून उलगडणार आहे. प्रेमकथा, नातेसंबंध, एकत्र कुटुंब असे अनेक पदर या चित्रपटातील कथानकाला आहेत. त्यामुळेच अत्यंत हळवी कथा, सुखद संगीत, उत्तम अभिनय, संवेदनशील लेखन या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

आणखी वाचा – ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन, वयाच्या ९१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

चित्रपटाच्या टीजरला, गाण्याला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमधूनही या चित्रपटाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे १० जुलैला प्रदर्शित होणारा ‘तुला पाहता’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Mardini Movie Marathi Movie

‘मालिकांचा बादशहा’ आता रुपेरी पडद्यावर, दिग्दर्शक अजय मयेकर यांचा ‘मर्दिनी’ ठरणार नवा टप्पा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.