Tmkoc Gurcharan Singh : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंह याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता कर्जबाजारीही होता. पण तिची मैत्रीण भारती सोनी हिने त्याला खूप पाठिंबा दिला आणि आर्थिक मदतही केली. त्याने सांगितले की, अभिनेत्यासाठी एक ब्रँड डील मिळाली आहे, ज्याने तो खूप आनंदी आहे आणि त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. इतकेच नाही तर त्याने उपोषण सोडण्याचे आश्वासनही दिले आहे. गुरुचरण सिंगची मैत्रिण भक्ती सोनी सतत अभिनेत्याच्या तब्येतीचे अपडेट्स देत आहे. गुरुचरण सिंह यांची जवळची मैत्रीण भक्ती सोनी हिने अभिनेत्यावर करोडोंचे कर्ज असल्याचा खुलासा केला आहे. सिंह यांच्या कुटुंबासह कोणीही त्यांना या कठीण काळात मदत करत नसल्याचा दावाही तिने केला.
भक्तीने ‘इटाइम्स’ला सांगितले, “मला गुरुचरणचा १३ लाख रुपयांचा ब्रँड डील मिळाला आहे. जो त्यांच्याकडे सुपूर्दही करण्यात आला आहे. यानंतर तो उपोषण सोडण्याच्या तयारीत आहे. त्याच शूटिंगसाठी तो महिन्याच्या अखेरीस मुंबईत येणार आहे”. भक्ती सोनीने सांगितले की, ती एका मैत्रिणीबरोबर अभिनेत्याला पुन्हा कामावर आणण्याचा प्रयत्न करत होती”. ती म्हणाली, “ही संधी त्यांना दाखवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली. आणि गुरुचरण लवकरच कामावर परततील याचा मला आनंद आहे. मी त्याला आणखी ३३ लाख रुपये दिले. तो माणूस जवळजवळ मरत आहे हे मला समजत आहे पण त्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही”.
आणखी वाचा – अमिताभ बच्चन यांनी ८३ कोटी रुपयांचं घर विकलं, चार वर्षांपूर्वी ‘इतक्या’ किंमतीत घेतलं होतं विकत
भक्तीने पुढे सांगितले की TMKOC च्या प्रचारक संघाच्या सदस्यांनी फोन करुन अभिनेत्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती. पण आर्थिक मदत केली नाही. ती म्हणाली, “त्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत हवी आहे की नाही हे कोणीही विचारले नाही”. भक्ती म्हणाली की, “अभिनेत्याला पैशाची नव्हे तर कामाची सर्वाधिक गरज आहे”. अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते काळजीत पडले आहेत. अनेकजण त्याच्या तब्येतीबाबत विचारणा करत आहे.
आणखी वाचा – “मला तुझ्याशी लग्न करायचंय”, अमृता खानविलकरकडे चाहत्याची अजब मागणी, म्हणाली, “ऑफरबद्दल धन्यवाद पण…”
जुलै २०२४ मध्ये गुरुचरण सिंह यांनी आर्थिक संघर्षाचा सामना केल्याची कबुली दिली होती. अभिनेत्याने असं म्हटलं होतं की, “मी इंडस्ट्रीतील लोकांना मला सपोर्ट करायला सांगत आहे. मी परत आलो आहे आणि मला खूप काम करायचे आहे. मलाही माझ्याकडे असलेली सर्व कर्जे एक एक करुन फेडायची आहेत, हे माझ्या कामातून होऊ शकते आणि मी कठोर परिश्रम करण्यास तयार आहे”. ५१ वर्षीय अभिनेत्याने सांगितले होते, “मला हे समजले आहे की, मी माझ्या जीवनातील इतर जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही माझा आध्यात्मिक प्रवास सुरु ठेवू शकतो”.