शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : जबरदस्त डान्स अन् शाही थाटमाट; तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाचा थाटच न्यारा, कलाकार मंडळींनी धरला ठेका आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 1, 2024 | 9:46 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding News in Marathi

तितीक्षा तावडे सिद्धार्थ बोडके लग्न

सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असताना मालिका विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली आहे. सिद्धार्थ व तितीक्षा यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला असून त्यांच्या लग्न सोहळ्यातील खास क्षण त्यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांसह शेअर देखील केले आहेत. कुटुंबीय व कलाकार मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा अगदी थाटामाटात लग्नसोहळा संपन्न झाला. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding)

तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नातील लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अशातच सिद्धार्थ व तितीक्षा यांनी सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या लग्नातील खास क्षणांचा एक व्हिडीओ साऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये लग्नाच्या तसेच हळदी व साखरपुड्यातील दिवसाची धामधूम पाहायला मिळत आहे. लग्न लागतानाचे काही खास क्षण, तसेच वरमाला घालतानाचे खास क्षण आणि मंगळसूत्र घालतानाचे काही खास विधी या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच सिद्धार्थ व तितीक्षा यांचा रोमँटिक अंदाजदेखील विशेष भावला.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनचं अंदमान प्रेम! गायनसेवेसाठी पोहोचताच मिळालं खास सरप्राइज, फोटो शेअर करत म्हणाली, “उपवास सोडण्यासाठी…”

View this post on Instagram

A post shared by Siddharth Bodke (@siddharthbodkeofficial)

दोघांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद पाहायला मिळत आहे. गेली बरीच वर्ष तितीक्षा व सिद्धार्थ बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होती. अखेर या दोघांनी लग्न करत त्यांच्या आयुष्यातील एक पाऊल पुढे टाकलं आहे. लगीनगाठ बांधली आहे. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ असं बोलतानाही दिसत आहे की, “अखेर तो दिवस आला, माझं माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न होतं आहे ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे”. व्हिडीओमधुन तितिक्षा व सिद्धार्थ यांचं अनोखं बॉण्डिंग साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

आणखी वाचा – पूजा सावंतने जपली मराठमोळी परंपरा, पारंपरिक पद्धतीच्या मंगळसूत्राला दिली पसंती, डिझाइन आहे फारच खास

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ व तितिक्षा यांच्या मित्रमंडळींचे धमाल-मस्ती करतानाचे काही खास क्षण देखील टिपले गेले आहेत. मित्रमंडळांची ही मस्ती पाहून सिद्धार्थ शेवटी असेही म्हणाला की, “आयुष्यात काय कमावलं तर हे असे मित्र”. तितीक्षा व सिद्धार्थचा हा रोमँटिक व्हिडीओ सध्या साऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत दोघांचं कौतुक केलं आहे व अभिनंदनाचा वर्षाव देखील केला आहे.

Tags: entertainmentTiteeksha Tawde Siddharth BodkeTiteeksha Tawde Siddharth Bodke MarriageTiteeksha Tawde Siddharth Bodke WeddingTiteeksha Tawde Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding Ceremony

बॉलिवूडच्या गर्दीत ठाकरे परिवाराची रॉयल एंट्री; अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगसाठी उद्धव ठाकरे पत्नी, मुलासह जामनगरला पोहोचले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.