रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वऱ्हाड निघालं लग्नाला!, तितीक्षा तावडेच्या लग्नाला निघाले ‘सातव्या मुलीची…’मधील कलाकार, नाकात नथ घालून गाडीमध्येच ऐश्वर्या नारकरांचा डान्स अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2024 | 11:55 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding News in Marathi

तितीक्षा तावडे सिद्धार्थ बोडके लग्न

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील कलाकार मंडळींनी त्यांच्या उत्तम अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. मालिकेतील नेत्रा व अद्वैतच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेतील अद्वैत म्हणजे अभिनेता अजिंक्य ननावरे काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री शिवानी सुर्वेबरोबर अजिंक्यने लग्न केलं. त्यानंतर आता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतील नेत्रा लवकरच बोहल्यावर चढणार आहे. (Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding Update)

मालिकेतील नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितीक्षा तावडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तितीक्षा अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या साखरपुडा सोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आज तितीक्षा व सिद्धार्थचा लग्नसोहळा उरकणार आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचा मंडपही सजलेला पाहायला मिळत आहे. अखेर आज ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नासाठी कलाकार मंडळीही सज्ज झाले असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – मुहूर्त ठरला, मंडपही सजला! सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नाची जय्यत तयारी, ‘या’ ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात होणार लग्न

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ऐश्वर्या नारकर या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत तितीक्षासह मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या त्यांच्या सहकलाकाराच्या लग्नाला निघालेल्या पाहायला मिळत आहेत. ‘खूप मोठा दिवस’, असं कॅप्शन देत त्यांनी लग्नाला जातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासह सुरुची अडारकर, एकता डांगरही पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा – परबांच्या घरी रमली नवी सूनबाई, लग्नानंतर प्रथमेश परबचा सुखी संसार, बायकोबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला…

ऐश्वर्या, सुरुची व एकता यांचा धमाल डान्स करतानाचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नासाठी कलाकार मंडळींसह त्यांचे चाहतेही उत्सुक आहेत. दोघेही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांच्या हळदी, साखरपुडा समारंभातील अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. दरम्यान, साखरपुड्यासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला होता. अभिनेत्रीने फिकट जांभळ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती. तर, अभिनेत्याने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी परिधान केली होती.

Tags: aishwarya narkarSuruchi AdarkarTiteeksha Tawde Siddharth Bodke MarriageTiteeksha Tawde Siddharth Bodke WeddingTiteeksha Tawde Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Anupam kher on Satish Kaushik

"रुग्णालयामध्ये जाण्यासाठी…", सतिश कौशिक यांनी मृत्यूच्या तीन तासांपूर्वी अनुपम खेर यांना केला होता फोन, मोठा खुलासा, म्हणाले, "शेवटचं बोलणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.