‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तितीक्षा तावडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तितीक्षाच्या घरी सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळणार आहे. तितीक्षा अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लगीनगाठ बांधणार आहे. दरम्यान, दोघांच्या लग्नापुर्वीच्या विधींचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आलेले पाहायला मिळत आहेत. तितीक्षा व सिद्धार्थच्या हळद व साखरपुड्याचे अनेक फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. (Titeeksha Tawde And Siddharth Bodke Haladi Ceremony)
तितीक्षा व सिद्धार्थला एकमेकांच्या नावाची हळद लागली असून त्यांच्या हळद समारंभातील फोटो समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये तितीक्षा व सिद्धार्थला हळद लावतानाचे खास क्षण पाहायला मिळत आहेत. दोघांनी एकमेकांना हळद लावलेलीही पाहायला मिळाली. यावेळी दोघांचा रोमँटिक अंदाज खास ठरला. शिवाय दोघेही थिरकतानाही दिसले. तितीक्षा व सिद्धार्थचा हळदी समारंभातील लूकही खास ठरला. दोघांनी त्यांच्या हळदीसाठी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. हळदीने माखलेल्या अंगाने या नववधूवरच सौंदर्य खूप खुलून आलं होतं.
तितीक्षा व सिद्धार्थ यांच्या हळदी समारंभाला कलाकार मंडळींची हजेरी लक्षणीय ठरत आहे. आपल्या मित्र-मैत्रिणीच्या हळदीला या कलाकारांनी धमाल, मस्ती करत रंगत आणलेली पाहायला मिळत आहे. अनघा अतुल, रसिका सुनील, ऋतुजा बागवे, गौरी नलावडे या कलाकारांचा हटके डान्स पाहणं रंजक ठरत आहे. तर बहिणीच्या हळदीला खुशबू तावडेही आनंदात असलेली पाहायला मिळाली. तर मेहुणीच्या हळदीला संग्राम समेळही धमाल करताना दिसला.
तितीक्षा व सिद्धार्थच्या हळदी समारंभातील डेकोरेशननेही साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. फुलांनी सजवलेलं हे डेकोरेशन खूप खास होतं. त्यांच्या हळदीमध्ये सिद्धार्थ व त्याचे बाबा आनंदाने डान्स करतानाही दिसले. त्याच्या बाबाच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी पाहण्यासारखा होता. सिद्धार्थ व त्याच्या बाबांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय दोघांच्या साखरपुड्याच्या फोटो व व्हिडीओवरही चाहते व कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.