मनोरंजन सृष्टीतील कलाकारांच्या लग्न सोहळ्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजा सावंत, मुग्धा वैशंपायन, गौतमी देशपांडे, स्वानंदी टिकेकर या अभिनेत्रींनबरोबरच अभिनेत्री तितीक्षा तावडेनेही लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाची ही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह शाही विवाह सोहळा उरकला. २६ फेब्रुवारी रोजी दोघांनी अगदी पारंपरिक थाटामाटात लग्न सोहळा उरकला. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली. (Titeeksha Tawde and Siddharth Bodake)
तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले पाहायला मिळाले. चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे दोघांच्या फोटो व व्हिडीओला पसंती दर्शवलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर ही तितीक्षा व सिद्धार्थ बऱ्यापैकी सक्रिय असलेले पाहायला मिळतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. लग्नानंतर ही जोडी बरीच चर्चेत असलेली पाहायला मिळाली.
दोघांच्या लग्नाला तीन महिने पूर्ण झालेत आणि लग्नाला तीन महिने पूर्ण होताच सिद्धार्थ व तितीक्षाने सोशल मीडियावरून एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्या व्हिडीओने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओ खाली त्यांनी दिलेल्या कॅप्शनची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
तितीक्षा व सिद्धार्थ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते दोघेही बीच व्ह्यूला एन्जॉय करताना दिसत आहेत. नारळांच्या झाडांचं सुंदर असं दृश्य पाहायला मिळत आहे. दोघेही हातात हात धरून बीचकडे जाताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.”तीन महिन्यांचं प्रेम, हास्य हे आहेच आणि पुढचे आयुष्यही असेच एकत्र साजरे करत राहू. आणखी बरेच काही आहे”, असं रोमँटिक कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या व्हिडीओवर कलाकार मंडळींनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.