शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अशा प्रकारचे बनावट फोटो…”, मॉर्फ केलेले फोटो पाहून भडकली जुई गडकरी, म्हणाली, “अशा फॅन पेजला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 11, 2024 | 3:39 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari Angry

मॉर्फ केलेल्या फोटोंवर जुई गडकरीचा संताप, पोस्ट शेअर करत केली विनंती

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘ठरलं तर मग’. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. मालिकेतील सायली व अर्जुन या पात्रांना तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत सायली ही भूमिका अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. तर अर्जुनच्या भूमिकेत अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे. जुई व अमित दोघेही या भूमिका उत्तम प्रकारे साकारताना दिसत आहे. चाहतेमंडळीही दोघांच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसत आहेत. (Jui Gadkari Angry)

जुई सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावरही जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. जुईचे अनेक फॅन पेजही असलेले पाहायला मिळतात. बरेचदा जुई तिचे मत सोशल मीडियावर सडेतोडपणे मांडतानाही दिसते. अशातच जुईने तिला न पटलेल्या एका विषयावर भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. जुईच्या एका फॅन पेजने मॉर्फ केलेले फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – …म्हणून राज कुमार यांनी कर्करोग झाल्याचे ठेवले लपवून, मुकेश खन्ना यांनी केला खुलासा, नेमकं काय होतं कारण?

जुईच्या एका फॅन पेजवरुन अमित भानुशाली बरोबर तिचे मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून जुईने त्या फॅन पेजला विनंती करत असं न करण्याची विनंती केली आहे. जुईने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत त्या फॅन पेजला उद्देशून एक पोस्ट करत चित्रित न केलेले फोटो पोस्ट केल्याने त्यांना विनंती करत खडेबोल सुनावले आहेत.

आणखी वाचा – “इंडस्ट्रीत माझा कोणी गॉडफादर नाही”, निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकताच प्राजक्ता माळीच वक्तव्य चर्चेत, कुटुंबासह साजरा केला वाढदिवस, फोटो समोर

जुईने पोस्ट शेअर करत, “कृपया अशा या पेजला ही एक दयाळू व प्रामाणिक विनंती आहे. माझे फोटो मॉर्फ करणे आणि नवीन फोटो तयार करणे थांबवा. जे फोटो तुम्ही सादर करत आहात ते मुळात चित्रित झालेले नाहीत. मी आमच्या सर्व फॅन पेजेसचा आदर करतो आणि त्यांचे कौतुक करतो. परंतु अशा प्रकारचे बनावट फोटो पाहून मला अतिशय वाईट वाटत आहे. मला आशा आहे की तुम्हाला माझा मुद्दा कळला असेल”, असं म्हटलं आहे.

Tags: jui gadkariJui Gadkari AngryJui Gadkari Angry On Fans
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Father
Entertainment

अक्षय केळकरचे वडील आजही चालवतात रिक्षा, रिक्षाचालक आणि मराठी वादाबाबत म्हणाले, ” इथे कमवता आणि…”

एप्रिल 24, 2026 | 4:39 pm
kashmira kulkarni injured leg
Entertainment

पायाला दुखापत, शस्त्रक्रिया आणि…; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ फेम अभिनेत्री मालिकेतून घेणार ब्रेक?, मोठी अपडेट समोर

एप्रिल 24, 2026 | 1:55 pm
Sunita Ahuja viral video
Entertainment

गोविंदा आणि त्याच्या पत्नीमध्ये पुन्हा बिनसलं, समोर आलेल्या व्हिडीओने झालं स्पष्ट, Video व्हायरल

एप्रिल 24, 2026 | 12:55 pm
Gayatri Datar Wedding
Entertainment

मराठी अभिनेत्रीची लगीनघाई, ग्रहमखचे फोटो समोर, होणाऱ्या नवऱ्यानेही लग्नविधीचे फोटो केले शेअर

एप्रिल 24, 2026 | 11:51 am
Next Post
Bigg Boss Marathi season 5

Bigg Boss Marathi : निक्की विरोधात चुगली सांगताच जान्हवीला आली चक्कर, प्रोमो पाहून सुप्रसिद्ध अभिनेत्याने लगावला टोला, म्हणाला, "ऍक्टिंगसाठी अवॉर्ड…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.