छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘ठरलं तर मग’. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. मालिकेतील सायली व अर्जुन या पात्रांना तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत सायली ही भूमिका अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. तर अर्जुनच्या भूमिकेत अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे. जुई व अमित दोघेही या भूमिका उत्तम प्रकारे साकारताना दिसत आहे. चाहतेमंडळीही दोघांच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसत आहेत. (Jui Gadkari Angry)
जुई सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावरही जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. जुईचे अनेक फॅन पेजही असलेले पाहायला मिळतात. बरेचदा जुई तिचे मत सोशल मीडियावर सडेतोडपणे मांडतानाही दिसते. अशातच जुईने तिला न पटलेल्या एका विषयावर भाष्य केलेलं पाहायला मिळत आहे. जुईच्या एका फॅन पेजने मॉर्फ केलेले फोटो शेअर केले आहेत.
आणखी वाचा – …म्हणून राज कुमार यांनी कर्करोग झाल्याचे ठेवले लपवून, मुकेश खन्ना यांनी केला खुलासा, नेमकं काय होतं कारण?

जुईच्या एका फॅन पेजवरुन अमित भानुशाली बरोबर तिचे मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून जुईने त्या फॅन पेजला विनंती करत असं न करण्याची विनंती केली आहे. जुईने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट करत त्या फॅन पेजला उद्देशून एक पोस्ट करत चित्रित न केलेले फोटो पोस्ट केल्याने त्यांना विनंती करत खडेबोल सुनावले आहेत.
जुईने पोस्ट शेअर करत, “कृपया अशा या पेजला ही एक दयाळू व प्रामाणिक विनंती आहे. माझे फोटो मॉर्फ करणे आणि नवीन फोटो तयार करणे थांबवा. जे फोटो तुम्ही सादर करत आहात ते मुळात चित्रित झालेले नाहीत. मी आमच्या सर्व फॅन पेजेसचा आदर करतो आणि त्यांचे कौतुक करतो. परंतु अशा प्रकारचे बनावट फोटो पाहून मला अतिशय वाईट वाटत आहे. मला आशा आहे की तुम्हाला माझा मुद्दा कळला असेल”, असं म्हटलं आहे.