सामान्य प्रेक्षकांच्या नेहमीच्या आयुष्यातील एक महत्वाचा एक घटक म्हणजे विविध वाहिन्यांवरील मोठ्या संख्येत पाहिल्या जाणाऱ्या आणि विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका. आणि याच मालिकांच्या विश्वात महत्वाच्या असणाऱ्या TRP ची शर्यतीत सध्या अव्वल स्तहनावर असलेली मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘ ठरलं तर मग ‘. सोबतच पहिल्या १७ मालिकांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिकांचा समावेश आहे.(Top 5 Marathi Serials)
TRP च्या शर्यतीत स्टार प्रवाह वाहिनी वरील ठरलं तर मग या मालिके बरोबरच पुढील पहिल्या ५ मालिकांचा समावेश आहे.
१) ठरलं तर मग – स्टार प्रवाह वाहिनी वरील पुढचं पाऊल या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली अभिनेत्री जुई गडकरीची महत्वचाही भूमिका असेलेली ठरलं तर मग हे मालिका प्रेक्षकांच्या पाहण्यानुसार नंबर १ ची मालिका ठरली आहे.
२) आई कुठे काय करते – आईची आपल्या आयुष्यात असलेली भूमिका आणि आईचे स्वतःसाठी घेतलेले निणय या साऱ्या गोष्टींबद्दल भाष्य करणारी स्टार प्रवाह वाहिनी वरील आई कुठे काय करते या मालिकेने TRP च्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आहे.
३)रंग माझा वेगळा – नवरा बायकोच्या आयुष्यातील विविध रंग दाखवणारी, पैलू मांडणारी मालिका असणारी स्टार प्रवाह वरील रंग माझा वेगळा ही मालिका या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.(Top 5 Marathi Serials)
४) सुख म्हणजे नक्की काय असत – एकत्र कुटुंबात होणाऱ्या जडणघडणी मुलींसाठी झटणारे आईवडील, अशा अनेक मटणावर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी आणखी एक मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असत. मालिकेतील जयदीप गौरी या जोडीमुळे प्रेक्षकांची या मालिकेप्रतीची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे.
५) तुझेच मी गीत गात आहे – TRP च्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवणारी मालिका ठरलीये स्टार प्रवाह वाहिनी वरील तुझेच मी गीत गात आहे.