रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कलर्स मराठी’वरील ही मालिका होणार बंद; मुख्य अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “Goodbye…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 18, 2026 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Colors Marathi Serial Off Air

मुख्य अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Colors Marathi Serial Off Air : ‘छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची एंट्री सुरू असताना अनेक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील अशीच एक गाजलेली मालिका आता लवकरच बंद होणार आहे. साधारण दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या मालिकेत पाच जिवलग मैत्रिणींची कथा दाखवण्यात आली होती आणि प्रेक्षकांकडून तिला चांगला प्रतिसादही मिळाला होता. अलीकडेच ‘कलर्स मराठी’ने दोन नवीन मालिकांची घोषणा केली आहे. यापैकी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चपासून सुरू झाली असून ‘मोहिनी’ ही नवी मालिका २३ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या नव्या कार्यक्रमांना जागा करून देण्यासाठी काही जुन्या मालिकांचा शेवट होत आहे. ‘इंद्रायणी’नंतर आता ‘पिंगा गं पोरी पिंगा’ हाही शो ऑफ एअर होणार आहे. १७ मार्च रोजी या मालिकेचे अंतिम चित्रीकरण पूर्ण झाले. शूटिंग संपताच कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत हा प्रवास संपल्याची माहिती चाहत्यांना दिली. मालिकेतील वल्लरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिने ‘One Last Time’ असा उल्लेख करत सेटवरील काही खास क्षण शेअर केले.

आणखी वाचा – आत्महत्येनंतर अनुराग डोभालची हॉस्पिटलमधून पहिली पोस्ट, बेडवरचा फोटो शेअर करत म्हणाला, “मी आज अनाथ आहे”

‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये सुरुवातीला पाच प्रमुख अभिनेत्री दिसल्या होत्या ऐश्वर्या शेटे (वल्लरी), विदिशा म्हसकर (तेजा), शाश्वती पिंपळीकर (प्रेरणा), प्राजक्ता परब (मिथिला) आणि आकांक्षा गाडे (श्वेता). त्यांच्या मैत्रीभोवती फिरणारी कथा प्रेक्षकांना आवडली होती. ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये मालिकेच्या शेवटच्या दिवसाचे फोटो, सेटवरील आठवणी आणि स्क्रिप्टची झलक पाहायला मिळते. एका फोटोमध्ये मालिकेतील अभिनेत्रींची फोटोफ्रेम दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘GoodBye Signing Off’ असा संदेश लिहिलेला आहे. तसेच तिने मालिकेतील तिच्या घराचा फोटोही शेअर केला असून दारावर “सौ. वल्लरी मनोज भामरे” अशी नेमप्लेट दाखवली. दीड वर्षांच्या प्रवासानंतर ‘पिंगा गं पोरी पिंगा’चा पडदा पडत असला तरी या मालिकेतील मैत्रीची गोष्ट आणि कलाकारांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार आहेत.

आणखी वाचा – ‘पारू’ मालिका अचानक बंद; अभिनेत्री शरयू सोनावणेने सांगितलं खरं कारण; म्हणाली, “निर्मात्यांकडून…”

Tags: Colors Marathi Serial Off Airmarathi actressmarathi entertainment newsmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
shilpa shirodkar interview

"मी सगळ्यांना सांगतेय मला काम हवंय", सुप्रसिद्ध अभिनेत्रीकडे नाही आहे काम, करिअरच्या शिखरावर असताना सोडलेली इंडस्ट्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.