स्टार प्रवाह या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे या वाहिनीवरील कार्यक्रमाचा टीआरपी सुद्धा चांगला आहे. ठिपक्यांची रांगोळी ह्या मालिकेने कमी वेळातच आपले एक वेगळे स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केले. या मालिकेत असलेले मुख्य पात्र अप्पू आणि शशांक यांची एकमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. नुकतेच या मालिकेचे पाचशे भाग पूर्ण झाले आहे. या निमित्ताने या मालिकेच्या सेटवर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. या बद्दलचा व्हिडीओ मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Thipkyanchi Rangoli 500 Episode)

या व्हिडिओला “आपण या ५०० भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिलीत आणि भरभरून प्रेम केलंत, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार..! त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!!आतापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे राहो, हीच प्रार्थना..! असे आभार मानणारे कॅप्शन दिले आहे.
हे देखील वाचा: द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आणि दादांच्या कपाळावर आदळली गदा रक्तबंबाळ कपाळाने शूट केला होता ‘तो’ सीन..
मालिकेत सुरु असलेल्या कथानकानुसार नेत्रा आणि अमेयचा एकत्र असतानाचा एक फोटो घरच्यांनी पहिला असल्यामुळे सगळेच जण अमेयला दोष देत आहे. मात्र अप्पू ही अमेयच्या बाजूने असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या मालिकेत अप्पू हे पात्र साकारणारी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि नेगीटिव्ह पात्र साकारणारी अभिनेत्री प्रांजल आंबवणे या दोघीनीं हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Thipkyanchi Rangoli 500 Episode)
हे देखील वाचा: फोटोवरून ‘या’ अभिनेत्रीला ओळखणं होतंय कठीण माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत साकारली होती प्रमुख भूमिका
अपूर्वा (अप्पू) ही एक अत्याधुनिक उच्चवर्गीय मुलगी, मध्यमवर्गीय संयुक्त कुटुंबातील विद्वान शशांकसोबत लग्न करते आणि सर्व काही बदलत. एका सुंदर प्रेमकथेशिवाय, यात संयुक्त कुटुंबाची कथा देखील दाखवली आहे, शशांकसोबतच्या काही भेटीनंतर, अप्पूचे वडील तिला नैतिकता शिकवण्यासाठी अप्पूचे शशांकसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतात. अप्पू जरा वेगळ्या स्वभावाची दाखवली असली तरी ती मनाने खूप चांगली दाखवली आहे. आता मालिकेत तिला शशांकच्या कुटुंबाकडून प्रेम मिळत आहे. ती कुटुंबाचा एक भाग बनली आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व अडचणींमध्ये अप्पू त्यांच्या पाठीशी उभी राहते.