बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आठवड्याभराच ओटीटीवर प्रदर्शित होणार ८ नवे चित्रपट व सीरिज, प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी, पाहा संपूर्ण यादी

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 26, 2024 | 6:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
OTT movie release

हे चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार

बॉलिवूडमधील सध्या ‘सिंघम अगेन’, ‘भूलभूलय्या’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. आता लवकरच हे चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीस येतील. नोव्हेंबर महिना संपण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. गुन्हेगारी, सस्पेन्स, रोमान्स अशा अनेक पठडीतील अनेक चित्रपट तसेच सिरिज बघायला मिळणार आहेत. तमन्ना भाटिया, जिमी शेरगिल, अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘सिकंदर का मुकद्दर’ हा चित्रपट भेटीस येणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार दुलकर सलमान यांचा ‘लकी भास्कर’देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोणते चित्रपट व सीरिज भेटीला येणार आहेत? त्याबद्दल आता जाणून घेऊया. (OTT movie release)

दाक्षिणात्य चित्रपट ‘लकी भास्कर’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. दुलकर सलमान यांची मुख्य भूमिका या चित्रपटात होती. तसेच अभिनेत्री मिनाक्षी चौधरीदेखील दिसून आली होती. या चित्रपटाला खूप पसंती मिळाली होती. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

आणखी वाचा – “टोमणे, त्रास आणि…”, नागा चैतन्यच्या दुसरं लग्न तोंडावर असताना पहिली बायको सामंथाचं भाष्य, म्हणाली, “वाईट वाटतं…”

अभिनेता जिमी शेरगिल, तमन्ना भाटिया, अविनाश तिवारी यांची मुख्य भूमिका असणारा ‘सिकंदर का मुकद्दर’ हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा एक क्राइम थ्रीलर चित्रपट आहे. ‘अवर लिटिल सीक्रेट’ हा एक हॉलिवूड रोमॅंटिक सिनेमा आहे. यामध्ये लिंडसे लोहानने एव्हरी व इयान होर्डिंगने लोगन यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट खूप रोमॅंटिक आहे. २७ नोव्हेंबर रोजी तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

आणखी वाचा – “मी दारु पिऊन आलो असं आईला वाटलं अन्…”, सिद्धार्थ जाधवने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “रात्री घरी आलो तेव्हा…”

‘हार्ड नॉर्थ’ ही एक सर्वायकल डॉक्युमेंट्री सीरिज आहे. आठ एपिसोड  मध्ये ही सीरिज दाखवण्यात आली आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ही सीरिज बघायला मिळणार आहे. २९ नोव्हेंबरपासून ही सीरिज पाहता येईल. तुम्हाला साऊथ कोरियन चित्रपट बघायला आवडत असतील तर ‘द ट्रंक’ हा एक रहस्यपट तुम्ही पाहू शकता. २९ नोव्हेंबरपासून ही सीरिज तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल.   तसेच ‘द मॅडनेस’, ‘द पॅरिस ख्रिसमस वॉल्ट्स’, ‘द स्नो सिस्टर’ हे चित्रपटही भेटीला येणार आहेत.

Tags: bollywood moviehollywood movieott
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
cotton fabric bags

फक्त २० रुपयांपासून वेगवेगळ्या व युनिक कापडी बॅग, माय-लेकींनी सुरु केलेला व्यवसाय, खरेदीसाठी ग्राहकांची होते गर्दी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.