Harshada khanvilkar and mrunal deshpande : अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांची मैत्री ही कलाविश्वात लोकप्रिय आहे. कलाविश्वात आजवर अनेक मित्र-मैत्रिणीच्या जोड्या आहेत ज्या बरेचदा एकत्र स्पॉट होताना दिसतात. वा सोशल मीडियाद्वारे ते नेहमीच फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतात. तर अशा काही मैत्री आहेत ज्या दिसत नसल्या तरी त्यांची नाती दृढ आहेत. अशीच कलाविश्वात एक मैत्रिणींची जोडी म्हणजे हर्षदा खानविलकर आणि मृणाल देशपांडे. हर्षदा व मृणाल यांची मैत्री गेल्या १४ वर्षांपासूनची आहे. आज दोघीही एकमेकांवर बऱ्याच अवलंबून आहेत आणि त्यांचं एकमेकींवर प्रचंड प्रेम आहे. इतकंच नाहीतर त्यांच्या कुटुंबाबतही एकमेकींना आदर आहे.
हर्षदा सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या मालिकेच्या सेटवर असतानाचा हर्षदा यांना मृणालने सरप्राईज भेट दिली. ही भेट इट्स मज्जा या युट्युब चॅनेलने घडवून आणली. यावेळी बोलताना मृणाल म्हणाल्या, “हर्षदा माझ्यासाठी इमोशनल कॉर्नर आहे. माझा विश्वास, माझा आशीर्वाद आणि माझा आत्मविश्वास हे हर्षदा आहे. आणि अर्थात ही माझ्या रामाची कृपा आहे”. यावर हर्षदा खानविलकर म्हणतात, “आपण काय बोलतो की, मैत्री केव्हा सुरु होते जेव्हा तुम्ही एकत्र काम करत नाही. पण माझ्या आयुष्यातील सगळी मैत्री ही कामाच्याच ठिकाणी सुरु झाली. याचा आणि माझ्या कामाच्या काहीही संबंध नाही, खरंतर हे सगळे मित्र मला कामामुळे भेटले”.
पुढे त्या म्हणाल्या, “मृणाल, आशुतोष, सुयश ही माझ्या आयुष्यातील तीन महत्त्वाची नाव आहेत. यांत संजयचं नाव मी घेत नाही कारण त्याचं आणि माझं नातं यापलीकडचं आहे. तो माझा बेस्ट फ्रेंड आहेच, याहून तो आता मृणालचा जास्त बेस्ट फ्रेंड आहे. त्याला तिची खूप काळजी असते. जितकी त्याला माझी काळजी आहे अगदी तशीच काळजी तो मृणालचीही घेतो. मृणाल हा संजयने कमावलेला मित्र आहे. मृणालवर कोणीही अवलंबून राहू शकतं, अशी ती आहे. मृणाल ही माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे की उद्या माझं काही बरं वाईट झालं, असं होणार नाही, इतक्या लवकर काय मी जात नाही, पण तरी झालं तर मला माहित आहे की, माझ्या आईचं माझ्या बहिणीबरोबर करायला ती असेल. आणि तिला हे तिचं इमोशनल कर्तव्य वाटेल”.
आणखी वाचा – हुमा कुरेशीच्या चुलत भावाच्या हत्येचं CCTV फुटेज समोर, अभिनेत्रीच्या वडिलांचाही आक्रोश, नेमकं घडलं काय?
शेवटी हर्षदा म्हणाल्या, “माझी धाकटी बहीण आहे आणि तिच्यावरही मृणालचं खूप प्रेम आहे. मित्र म्हणून तुम्ही जेव्हा इतके खात्रीशीर असता की माझं काही झालं तर त्यानंतर तुमच्या कुटुंबाचं करायला ती आहे. माझी आई याक्षणी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची व्यक्ती आहे. आणि माझ्या अपरोक्ष माझी सख्खी बहीण आहेच पण जिचं माझ्या आईकडे लक्ष असेल अशी मृणाल आहे”.





