शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला रंग, उंची आवाजावरुन हिणवण्यात आले अन्…”, जुई गडकरीचा इंडस्ट्रीत काम करण्यावरुन मोठा खुलासा, म्हणाली, “काळी आली असं बोलले…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 22, 2024 | 10:59 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharla Tar Mag fame actress Jui Gadkari told her many negative experiences about her height and voice.

"मला रंग, उंची आवाजावरुन हिणवण्यात आले अन्…", जुई गडकरीचा इंडस्ट्रीत काम करण्यावरुन मोठा खुलासा, म्हणाली, "काळी आली असं बोलले…"

कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात अनेक चांगले-वाईट अनुभव हे येतच असतात. यापैकी वाईट अनुभवच जास्त असतात. मात्र या अनुभवांमधून काहीना काही शिकत पुढे जातो तोच खरा कलाकार म्हणून मानला जातो. अशाच चांगल्या-वाईट अनुभवांमधून शिकत, सवरत आज अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. स्टार प्रवाह वहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात तिचं पहिलं पाऊल टाकलं. यानंतर अभिनेत्रीची या क्षेत्रातील घोडदौडही अजूनही चालूच आहे.

मात्र याच क्षेत्रात सुरुवातीला जुईला अनेक वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. जुईने नुकतीच ‘कॉकटेल स्टुडिओ’ला मुलाखत दिली. यात तिला तिच्या तिच्या नकारात्मक अनुभवांविषयी विचारण्यात आले. याचे उत्तर देत तिने तिला असे खूप अनुभव आल्याचे सांगितले. तिला तिच्या उंची व आवाजावरुन अनेकदा बोलले गेले असल्याचेही सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

याबद्दल बोलताना जुई असं म्हणाली की, “मला माझ्या उंची व त्वचेच्या रंगावरुन अनेकदा बोलण्यात आले आहे. माझ्या आवाजावरुनही मला बोलण्यात आले आहे. माझा आवाज बारीक आहे, मला भसाड्या आवाजात बोलता येत नाही. मी लहानपणापासून गायन करत असल्यामुळे माझा आवाज तसा आहे. त्यामुळे मला आवाजावरुन बोललं गेलं आहे. मी जशी उभी राहते. त्यारुनही मला बोललं गेलं आहे. हिरोईन असे कपडे घालते का? हिरोईन इतकी फ्लॅट असते का? असं खूप काही बोललं गेलं आहे”.

आणखी वाचा – नवऱ्याचा बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली तितीक्षा तावडे, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आपलं स्वप्न…”

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आता मी खूप सहजरित्या या गोष्टी सांभाळते. आता कुणी काही बोलल्याने मला फरक पडत नाही. पण जेव्हा एक नवीन मुलगी या क्षेत्रात आलेली असते, तिला तिच्या तिच्या रंग व दिसण्यावरुन बोलता तेव्हा तिच्या मनावर याचा काय परिणाम होतो याचा कुणी कधीच विचार करत नाही आणि ही खूपच चुकीची गोष्ट आहे. इथे ही गोष्ट खूप प्रचलित आहे. मला काळी आली, काळी आली हिला कटर स्टँड म्हणून वापरा असंही बोललं गेलं आहे”.

आणखी वाचा – नेत्राच्या बाळाला मारण्याचा रुपालीचा पहिला प्रयत्न अयशस्वी, काय असेल विरोचकाची नवीन खेळी?

दरम्यान, यापुढे जुईने तिच्या रंगावरुन बोलण्यामुळे तिने गोरी होण्यासाठीही खूप भयानक प्रकार केला असल्याचे सांगितले. तसेच याचेही तिला खूप गंभीर परिणाम भोगावे लागले असल्याचे जुईने या मुलाखतीदरम्यान सांगितले.   

Tags: jui gadkariJui Gadkari Negative Experiencemarathi actress
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi Actor Sankarshan Karhade shared post about his 'Drama Juniors' show.

“मी साफ नकारच दिला होता पण…”, ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेचा होता नकार, म्हणाला, "परिक्षकाचा मान…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.