स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील सायली आणि अर्जुन या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत सायली ही भूमिका करतेय तर अभिनेता अमित भानुशाली या मालिकेत अर्जुन ही भूमिका साकारतोय. ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुन सुभेदार या पात्रामुळे अमितला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. याआधीही अमितने अनेक मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच अमितने सोशल मीडियावरून केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.(Amit bhanushali travelled by mumbai local)
अमितचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. नुकताच अमितने मुंबईच्या लोकलने प्रवास केल्याचा एक फोटो स्टोरीला पोस्ट केला होता. बऱ्याच कालावधीनंतर लोकलने प्रवास केल्याचा आनंद अमितने सोशल मीडियावरून स्टोरी पोस्ट करत केला.
पाहा लोकल ट्रेनमध्ये अमित सोबत घडला मजेशीर किस्सा (Amit bhanushali travelled by mumbai local)
मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करतानाचा एक गमतीदार अनुभवही त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. अमितने लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर उभे असलेले त्याचे फोटो शेअर केले आहेत. मात्र गंमत अशी झाली की अमितच्या ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या चाहत्यांना तो डुप्लिकेट अर्जुन सुभेदार वाटला.
अमितने सोशल मीडियावर त्याचा हा अनुभव शेअर करत लिहिले आहे की, ‘ट्रेनने प्रवास करणे मजेशीर आहे. लोक तुमच्याकडे असे पाहतात की ते तुम्हाला ओळखतात आणि मग त्यांना असे वाटते की मी अर्जुन सुभेदारचा डुप्लिकेट आहे.’ यावरून असे कळतेय की अमितचे चाहते त्याला ओळखू शकलेले नाहीत. दरम्यान अमितच्या चाहत्यांनी त्याला न ओळखल्याने अमितची ही पोस्ट विशेष चर्चेत आली आहे.
हे देखील वाचा – अरुण कदम यांच्या लेकीचं पारंपरिक लूकमधील खास मॅटर्निटी फोटोशूट
‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन आणि सायली या दोघांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेले दाखवण्यात आलं आहे. दरम्यान मालिकेत एकामागोएक रंजक वळण ही येतंच आहेत. अर्जुनची आजी पूर्णा आजीने सायलीला मोठ्या कालावधीनंतर स्वीकारलेल पाहायला मिळतंय, मात्र ही गोष्ट अर्जुनला पटलेली नसून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याने वर्षभराने त्यांना घटस्फोट घ्यायचा आहे. आजीने त्यांचं लग्न स्वीकारलं तर घटस्फोट घेणं दोघांनाही कठीण होऊन बसेल. त्यामुळे सायली पूर्णा आजीच्या नजरेत वाईट सून ठरावी याकरता अर्जुन वाट्टेल ते प्रयत्न करत असल्याचा ट्रॅक सुरू आहे
