गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

खजूर, कुरमुरे विकले, आर्थिक संकटाने घर गमावलं आणि…; ‘ठरलं तर…’च्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यातील स्ट्रगल, आजही मालिकेसह करतो कॉर्पोरेट जॉब

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 28, 2025 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amit Bhanushali Incident

खजूर, कुरमुरे विकले, आर्थिक संकटाने घर गमावलं आणि…; 'ठरलं तर…'च्या अर्जुनचा खऱ्या आयुष्यातील स्ट्रगल, आजही मालिकेसह करतो कॉर्पोरेट जॉब

Amit Bhanushali Incident : मराठी मालिकांच्या दुनियेतला एक चेहरा, जो प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिला आहे तो म्हणजे अमित भानुशाली. ‘ठरलं तर मग’ मालिकेत अर्जुन सुभेदार म्हणून प्रेक्षकांनी त्याला मोठ्या उत्साहाने स्वीकारलं. पण आज जिथे तो उभा आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने प्रचंड संघर्ष केला होता, हे तुम्हाला माहिती आहे का? तर आजच्या या व्हिडीओतून अमितचे काही अनोळखी किस्से जाणून घेणार आहोत. जे आजही प्रेक्षकांना अपरिचित आहेत. अमितने ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आधी अनेक मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे. ‘स्टार प्रवाह’वरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही मालिका, सुचित्रा बांदेकर यांच्याबरोबर केलेली हिंदी मालिका, तसेच ‘धर्म योद्धा गरुड’, ‘सासूबाई गेल्या चोरीला’, आणि ‘शु तमे कुँवार छो’ सारखे गुजराती चित्रपट यात त्याने आपली कला दाखवली आहे.

आता तो ‘स्टार प्रवाह’च्या नंबर १ मालिकेत ‘ठरलं तर मग’ मध्ये अर्जुनच्या भूमिकेत झळकत असून प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळवत आहे. पण मनोरंजनविश्वातील त्याचा प्रवास सोपा नव्हता. एकदा अमितच्या वडिलांना बिझनेस पार्टनर्सनी फसवलं आणि कुटुंबावर मोठं आर्थिक संकट ओढवलं. त्यावेळी त्याने घर ही गमावलं होत. अशा कठीण परिस्थितीत वडिलांसोबत अमितने खजूर, कुरमुरे, अगदी चकलीही विकण्याच काम केलं होत. मित्रमंडळी त्याला कुरमुरेवाला म्हणून चिडवायचे, पण आई आणि पत्नीच्या खंबीर साथीनं तो संघर्ष करत राहिला.

आणखी वाचा – लग्नाच्या अडीच वर्षानंतर सुप्रसिद्ध गायिका होणार आई, पारंपरिक अंदाजात केलं डोहाळ जेवण, फोटो व्हायरल

करिअरमध्ये संधी मिळाल्या तरी स्थिरता येण्याआधीच कोविड आला आणि पुन्हा कामं थांबली. तरीही अमितने हार मानली नाही. छोटी-मोठी कामं करत त्याने आपला प्रवास सुरु ठेवला. अमितसमोर आणखी एक मोठं आव्हान होतं ते म्हणजे speech anxiety. शाळा-कॉलेजमध्ये लोक काय म्हणतील? या भीतीने तो बोलायालाच घाबरायचा. स्टेजवर उभं राहिलं की आवाज अडखळायचा, हात थरथरायचे. त्याला वाटायचं, “मी अभिनयाच्या क्षेत्रात कधीच टिकू शकणार नाही” पण थिएटर डिप्लोमा, सततचा सराव आणि गुरूंचं मार्गदर्शन यामुळे त्याने ही भीती हळूहळू जिंकली.

View this post on Instagram

A post shared by Shraddha Amit Bhanushali (@shraddhas09)

आणखी वाचा – प्रीतमचा आत्महत्येचा प्रयत्न, पारू-आदित्य जीव वाचवायला येणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

दरम्यान, मालिकांपासून तब्बल नऊ वर्षं दूर राहिल्यानंतर पुन्हा परतणं त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं. पण ‘ठरलं तर मग’ मध्ये अर्जुन सुभेदारच्या भूमिकेत त्याने शानदार पुनरागमन केलं. या भूमिकेसाठी त्याने तब्बल १७ किलो वजन कमी केलं. अभिनयासाठीची प्रामाणिकता आणि स्वतःला बदलण्याची तयारी यामुळेच तो प्रेक्षकांचा लाडका ठरला. पण या मजेदार आठवणींसोबतच त्याच्या आयुष्यात भावनिक क्षणही आहेत. वडिलांची आठवण काढताना तो इतका भावुक होतो की डोळ्यांतून अश्रू अनावर होतात.

आणखी वाचा – ‘कमळी’च्या टीमनं मारली बाजी, अनिकाची हार होताच झाला संताप; कोणता नवा डाव आखणार?, प्रोमो समोर

याशिवाय आणखी एक गोष्ट जी आजही फार कमी लोकांना माहिती आहे, ती म्हणजे मराठी मालिकाविश्वातील नंबर वन मालिकेत काम करत असतानाही अमित कॉर्पोरेट जॉब करतो. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, “शूटिंगमध्ये वेळ मिळाल्यावर मी लॅपटॉप काढून काम करायला बसतो… आणि दिवसातून फक्त चार ते पाच तास झोपतो.”याशिवाय, आज मेहनतीने आणि जिद्दीने उभं केलेलं स्वतःचं घर हे त्याचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे. असा हा मेहनती, संवेदनशील आणि समर्पित अभिनेता अमित भानुशाली. आयुष्यातील भीती, संघर्ष आणि अडचणींवर मात करत त्याने स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्याची कहाणी सांगते जिद्द आणि मेहनत असेल, तर कोणतंही स्वप्न पूर्ण करणं शक्य आहे.

Tags: amit bhanushaliAmit Bhanushali Incidentmarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
mahesh manjrekar first wife passed away

महेश मांजरेकरांच्या पहिल्या पत्नीचे निधन, आईच्या आठवणीत लेक सत्याची भावुक पोस्ट, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.