शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जुई गडकरीला करायचं आहे लग्न, होणाऱ्या नवऱ्याबाबत सांगितल्या अपेक्षा, म्हणाली, “प्रपोज न करता…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 10, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
‘ठरलं तर मग’ मालिका फेम अभिनेत्री जुई गडकरीने तिला खऱ्या आयुष्यात जोडीदार कसा हवा आहे? याबद्दल सांगितलं आहे.

खऱ्या आयुष्यात ‘असा’ जोडीदार हवा, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीचं भाष्य

मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी आणि या कलाकारांच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांना कायमच रस असतो. त्यात या कलाकारांच्या लग्नासाठीही अनेक चाहते उत्सुक असतात. अशीच टेलिव्हिजन विश्वात एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, जिच्या लग्नाची तिच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून राहिलेली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली अर्थात जुई गडकरी. सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला याआधी अनेकदा लग्नाबद्दल विचारलं आहे. “लग्न कधी करणार? कुणाबरोबर करणार?” अशा प्रश्नांसह काही चाहत्यांनी तर तिला लग्नासाठी मागणीही घातली आहे. याबद्दल जुईने अनेकदा भाष्यही केलं आहे. अशातच आता तिने तिला कसा जोडीदार हवा आहे याबद्दल सांगितलं आहे. (jui gadkari on her partner)

सोशल मीडियावर अभिनेत्री जुई गडकरीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. कामाव्यतिरिक्त ती वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टीही सोशल मीडियावर शेअर करत असते. तसंच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवरील धमाल-मस्तीही ती व्हिडीओद्वारे शेअर करताना दिसते. अशातच तिने नुकताच ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधला आणि या संवादात तिने तिच्या जोडीदाराबद्दल भाष्य केलं आहे. तसंच ती जुन्या काळातली असून तिला खर्चीक गोष्टी आवडत नाहीत, याबद्दलही तिने सांगितले. मालिकेत नुकताच अर्जुनने सायलीला बस स्टँडवर प्रपोज केल्याचा सीन पाहायला मिळाला. यावरुनच जुईला तिच्या जोडीदाराने कसं प्रपोज केलेलं आवडेल? असा प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा – “रिप्लेसमेंटवाल्या भूमिका करु नये आणि…”, तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर मुक्ता साकारणाऱ्या अभिनेत्रीला प्रेक्षकांचा सल्ला, दिलं सडेतोड उत्तर

याबद्दल जुई गडकरी असं म्हणाली की, “लग्नाबद्दलची माझी अशी काही फार रम्यक कल्पना नाही. पण मला सगळ्यात चांगली गोष्ट ही वाटेल की, प्रपोज न करताही जर एकमेकांच्या भावना कळल्या तर खूप चांगलं. पण अगदी साध्या व सोप्या पद्धतीने गोष्टी झाल्या तर मला आवडेल. एखादे नाते मैत्रीतून पुढे गेलं तर खूप चांगलं असतं असं मला वाटतं. त्यातूनच एकमेकांचे स्वभाव कळलेले असतात. त्यामुळे कळून जातं की, प्रेम आहे वगैरे. त्यामुळे मला औपचारिकता म्हणून प्रपोज करण्याची वगैरे गरज नाही”.

आणखी वाचा – “एकटीनेच करतेस नवरा नाहीच आणि…”, अमृता खानविलकरच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट, म्हणाली, “अहो टीझरवरुन…”

यापुढे जुईने स्वत:च्या लग्नाबद्दल असं म्हटलं की, “सेटवर मला सगळेजण लग्नासाठी प्रेरित करतात. हे वर्ष गेलं आता पुढचं वर्ष आलं. आता तरी लग्न कर असं म्हणतात. त्यामुळे बघू आता”. दरम्यान, जुई ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. या मालिकेतील तिची भूमिका चाहत्यांना भलतीच आवडते. त्यामुळे या मालिकेत तिच्या सीनसाठी चाहतेमंडळी चांगलेच उत्सुक आहेत.

Tags: jui gadkarijui gadkari marriagejui gadkari on her partner
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 fame kokan hearted girl Ankita Walawalkar bought a new expensive car photo viral

"आवडी आली" म्हणत अंकिता वालावलकरने घेतली महागडी आलिशान कार, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केला खास फोटो

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.