गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्न नाही, कुटुंब नाही…”, फुकटचा सल्ला देणाऱ्याला जुई गडकरीने खडसावलं, म्हणाली, “अशा माणसांची कीव…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 24, 2025 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
 jui gadkari slams netizen

"लग्न नाही, कुटुंब नाही…", फुकटचा सल्ला देणाऱ्याला जुई गडकरीने खडसावलं, म्हणाली, "अशा माणसांची कीव…"

 jui gadkari slams netizen : सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा नेटकरी कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत अयोग्य कमेंट्स करताना दिसतात. काही कलाकार अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करतात, तर काही कलाकार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसतात. सोशल मीडियावर कलाकार मंडळी या ट्रोलिंगबाबत स्पष्टपणे व्यक्त होताना दिसतात. आजवर अनेक कलाकारांनी ट्रोलिंगबाबत संताप व्यक्त केला आहे. यापाठोपाठ आता ठरलं तर मगच्या जुई गडकरीलाही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री जुई गडकरीलाही असाच काहीसा अनुभव आला आहे.

कायमच मालिकेत आणि खऱ्या आयुष्यात संयमी आणि शांत स्वभावासाठी ओळखली जाणारी जुई साधारणपणे कधीच रागावलेली दिसत नाही, पण चुकीच्या गोष्टींवर ती शांत न बसता आपली भूमिका स्पष्ट मांडताना दिसते. अलीकडेच जुईने नवरात्रीनिमित्त एक फोटोशूट केलं होतं आणि त्याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. हे फोटो पाहून एका नेटकऱ्याने तिला वैयक्तिक मेसेज केला. त्या मेसेजचा स्क्रीनशॉट जुईने स्वतःच आपल्या अकाउंटवर शेअर करत संताप व्यक्त केला.

आणखी वाचा – भूषण प्रधानचा ‘तू माझा किनारा’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात, मोशन पोस्टरमधील चिमुकलीच्या गोड आवाजानं वेधलं लक्ष

त्या मेसेजमध्ये नेटकऱ्याने म्हटलं होतं “जुई लग्न कर… कोणीही असूदे पण कर. टीआरपी कमी आहे, तुमचं मार्केटिंग कमी पडलंय. मेकअप वेगळा, दिसणं वेगळं. मालिकेत मोठ्या असाल पण लग्न नाही, कुटुंब नाही, विचार करा…”, असा चुकीच्या अर्थी आणि खासगी संदेश तिला पाठवला. यावर प्रतिक्रिया देताना जुई म्हणाली “अशा माणसांची कीव येते. लवकर बरे व्हा. देव तुम्हाला सद्बुद्धी देवो. #sickpeople #sickmind”. जुईने स्क्रीनशॉट शेअर करत त्या संबंधित इसमाची चांगलीच कानउघडणी केली.

आणखी वाचा – दोन्ही पायांना पोलिओ, दुःख -संकटांचा सामना आणि…; वीणा जामकरची सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची भावुक पोस्ट, म्हणाली…

सध्या जुई ठरलं तर मग मालिकेत सायली या भूमिकेमुळे चर्चेत आहे. गेले अडीच वर्ष ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळाली. या मालिकेपूर्वी जुईने पुढचं पाऊल, सरस्वती, यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. मालिकाविश्वात जुई नेहमीच सक्रिय आहे. याशिवाय सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते.

Tags: jui gadkarijui gadkari slams netizenmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Premachi Goshta 2

'ओल्या सांजवेळी'मध्ये प्रेमाची नवी केमिस्ट्री पाहायला मिळणार, ललित प्रभाकर-ऋचा वैद्यच्या भूमिकांनी वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.