बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पूर्णा आजीच्या निधनानंतर चैतन्य का व्यक्त झाला नाही?”, प्रेक्षकांच्या प्रश्नावर अभिनेत्याने शेअर केल्या भावना, म्हणाला, “गमावलेल्या व्यक्तीशी माझं नातं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 18, 2025 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
tharala tar mag jyoti chandekar

पूर्णा आजीच्या निधनानंतर चैतन्य का व्यक्त झाला नाही?", प्रेक्षकांच्या प्रश्नावर अभिनेत्याने शेअर केल्या भावना, म्हणाला, "गमावलेल्या व्यक्तीशी माझं नातं…"

tharala tar mag jyoti chandekar : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ६९व्या वर्षी निधन झाले. अचानक निधनाची बातमी समोर आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. निधनाच्या आधी तीन-चार दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. आणि उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अडीच वर्षांपासून त्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पूर्णा आजी ही भूमिका साकारत होत्या. त्यांच्या अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीही हळहळली. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे अंत्यसंकार करण्यात आले. त्यांना शेवटचे पाहण्यासाठी अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.

पूर्णा आजीच्या निधनानंतर ‘ठरलं तर मग’ मालिकेतील जुई गडकरी, अमित भानुशाली, मोनिका दबडे, प्रियांका तेंडोलकर, शिल्पा नवलकर, प्राजक्ता दिघे या कलाकारांनी भावुक पोस्ट शेअर केल्या. मालिकेतील कलाकार, सहकलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांनीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ज्योती यांना श्रद्धांजली वाहिली. या यादीत ठरलं तर मगच्या एका कलाकाराचं नाव पाहायला मिळालं नाही, तो अभिनेता म्हणजे अर्जुनचा मित्र चैतन्य म्हणजेच अभिनेता चैतन्य सरदेशपांडे.

आणखी वाचा – टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या १३ वर्षांनी घरी आली लक्ष्मी, फोटो समोर

पूर्णा आजीच्या निधनानंतर चैतन्य का व्यक्त झाला नाही?, असा सवाल त्याच्या चाहत्यांसह अनेकांना पडला. याबाबत त्याच्या चाहत्यांनी त्याच्याकडे विचारपूसही केली. यावर अभिनेत्याने त्याच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर भावना व्यक्त केल्या. चैनत्यने भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “तुमच्यापैकी अनेकांनी मला विचारलं की, माझ्या संवेदना, दुःखाबद्दल मी इन्स्टाग्रामवर काहीच का शेअर केलेलं नाही. मी त्या सगळ्यांना हे सांगू इच्छितो की, इन्स्टाग्राम हे माझ्यासाठी व्यक्त होण्याचं माध्यम नाही आहे”.

आणखी वाचा – जेजुरीत खंडोबाच राहायला येणार! ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्याच जेजुरीत होणार हक्काचं घर, भूमिपुजनाचे फोटो समोर

त्याने पुढे म्हटलं, “माझ्या आठवणी, माझं दुःख आणि आपण गमावलेल्या व्यक्तीशी असलेलं माझं नातं हे खूप वैयक्तिक आहे. सोशल मीडियावर मी काहीच शेअर केलं नाही, शांत होतो याचा अर्थ असा नाही की मला काळजी नव्हती. याचा अर्थ असा आहे की, मी माझ्या भावना खाजगीत ठेवतो. मी त्या भावना, आठवणी माझ्या हृदयात कायम जपून ठेवतो त्या गोष्टी सोशल मीडियाच्या फिडवर मांडता येणार नाहीत”.

Tags: jyoti chandekarmarathi actorTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Achyut Potdar death

'३ इडियट्स' फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन, वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.