Tharla Tar Mag : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेली मालिका आहे. या मालिकेने आजवर प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेचं कथानक आणि मालिकेतील कलाकारांनी या मालिकेला एका उंचीवर नेऊन ठेवलं. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. सध्या मालिका एका रंजक वळणावर आहे. मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यासाठी आणि प्रियाचा खोटेपणा समोर आणण्यासाठी अर्जुन-सायली खूप प्रयत्न करत आहेत. याच बरोबर सायली घरातल्या सगळ्यांची मन जिंकून घेण्याचा देखील प्रयत्न करत आहे.
आता सायलीला आणखी एका व्यक्तीची मनधरणी करावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुनची बहीण अस्मिता तिच्या नवऱ्याकडे राहायला गेल्याचं मालिकेत पाहायला मिळालं होतं. तर आता अस्मिता पुन्हा या मालिकेत एंट्री घेणार आहे. मोनिका दबाडेने मालिकेत अस्मिता ही भूमिका साकारली आहे. मात्र खऱ्या आयुष्यात ती आई होणार असल्याने तीने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. आता मात्र तीन महिन्यांनंतर ती पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे.

नुकतीच तिने तिची इंस्टग्राम स्टोरी शेअर करत हिंट दिली आहे. त्यावर तिने ‘माय हॅपी प्लेस’ असं लिहिलं आहे. या व्हिडीओमधील तिचा लूक अस्मिताच्या भूमिकेसारखा हुबेहूब दिसतोय आणि यामधील बॅकग्राऊंड पाहता तिची मालिकेच्या सेटवर एन्ट्री झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. आजकाल अनेक अभिनेत्री आहेत ज्या आई झाल्यानंतर काही महिन्यांचा ब्रेक घेत कामावर परतलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. घर आणि काम या दोन्ही जबाबदाऱ्या त्या उत्कृष्टपणे पेलवताना दिसतात. यांत आता मोनिकाच नाव घेणंही वावगं ठरणार नाही.
आता मोनिकाची म्हणजेच अस्मिताची पुन्हा या मालिकेत एन्ट्री केव्हा दाखवणार आणि तिच्या एन्ट्रीने या मालिकेत पुढे कोणते टर्न अँड ट्विस्ट येणार हे पाहणं रंजक ठरेल. तर सायली अस्मिताच मन जिंकेल का?, की अस्मिता व प्रिया मिळून सायलीला त्रास देणार असे असंख्य प्रश्न मोनिकाची स्टोरी पाहून पडले आहेत.