tharla tar mag latest episode : ‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एका रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. अखेर साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे ३० जुलैची. येत्या ३० जुलैला मालिकेत विलास खुनाचा निकाल लागणार आहे. आणि याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अर्थात या खुनात साक्षीचा हात आहे हे साऱ्यांना माहित आहे मात्र कोर्टात पुराव्यासहित हे सिद्ध झालेलं नाही. महीपत, दामिनी साक्षीचा बचाव करण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहेत. तर यापूर्वी दामिनी वकील एकही केस हरलेल्या नाहीत त्यामुळे त्यादेखील अर्जुन काही पुरावे सादर करण्याआधी प्रियाला यांत ओढायचं ठरवतात.
मात्र, अर्जुनचं प्रियाला या खुनात दोषी ठरवतो. त्यामुळे दामिनी वकील सुटकेचा श्वास सोडतात. दामिनी प्रियाला अडकवण्याच्या आधीच अर्जुनच प्रियावर विलासचा खून केल्याचा आरोप करतो. हे सगळं ऐकून तिथे उपस्थित असलेल्यांना मोठा धक्का बसतो. अर्जुन उलट सुलट प्रश्न विचारून प्रियाला भांबवून सोडतो. तेव्हा रागाच्या भरात प्रिया सत्य बोलून मोकळी होते. या खुनात माझा काहीच संबंध नाही असं ती स्पष्ट बोलते. आणि हा खून साक्षीने केला आहे असं ती जीव तोडून सांगते. हे ऐकून साऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, याचा प्रोमो स्टार प्रवाह वाहिनीच्या युट्युब पेजवर शेअर करण्यात आला आहे.
गेली अनेक वर्ष या खुनाचा निकाल काय लागणार?, अर्जुन योग्य ते पुरावे गोळा करुन ही केस जिंकणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर आता अर्जुनने त्याची युक्ती लढवत प्रिया आणि साक्षीचा पर्दाफाश केल्याचं पाहायला मिळत आहे. आता प्रियाने सत्य सांगितल्यानंतर कोर्ट यावर काय निकाल देणार?, प्रिया व साक्षीला अटक होणार का? याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तर ‘इट्स मज्जा’ या युट्युब चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रिया आणि साक्षीला बेड्या ठोकलेल्या पाहायला मिळत आहेत. हे पाहून तर साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
प्रिया आणि साक्षीचा पर्दाफाश झाल्याने चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. सत्याच्या बाजून निकाल लागला म्हणून प्रेक्षक अर्जुनचंही कौतुक करत आहेत. आता मालिकेत पुढे आणखी कोणते ट्विस्ट येणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.





